• Download App
    अभिनेत्याने खऱ्या हिराप्रमाणे वागावे, कारच्या टॅक्सचोरीप्रकरणी न्यायालयाने सुपरस्टार थलापती विजयला फटकारले|Actor should act like a real actor, court slaps superstar Thalapati Vijay in car tax evasion case

    अभिनेत्याने खऱ्या हिराप्रमाणे वागावे, कारच्या टॅक्सचोरीप्रकरणी न्यायालयाने सुपरस्टार थलापती विजयला फटकारले

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : अभिनेत्यांनी खऱ्या हिरोप्रमाणे वागावे. टॅक्स चोरीला राष्ट्रीय विरोधी विचार आणि मानसिकता समजले पाहिजे. असे म्हणत दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार थलापती विजय याला न्यायालयाने फटकारले आहे.Actor should act like a real actor, court slaps superstar Thalapati Vijay in car tax evasion case

    सुपरस्टार विजय याने २०१२ साली सुपरस्टार विजयने इंग्लंडमधून आयात केलेली एक महागाडी कार खरेदी केली होती. या कारची किंमत तब्बल 7.95 कोटी इतकी आहे. पण अभिनेता विजयने या कार मागचा कर भरलेला नव्हता.



    या कारवरील कर माफ करण्यात यावा यासाठी त्याने सरकारकडे अर्ज केला होता. आता या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालायाने निर्णय दिलाय. खरेदी केलेल्या इंपोर्टेड कारवरील कर न भरल्यामुळे जवळपास १ लाखांचा दंड आकारला आहे.

    आठ वषार्पूर्वी इंग्डंल मधून आयात केलेल्या कारवरील कर वाचवण्यासाठी विजयने भरपूर प्रयत्न केले. यासाठी त्याने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून विजयने या कारवरील कर चुकवला होता. त्यानंतर तब्बल नऊ वषार्नंतर उच्च न्यायालयाने विजयने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. एक लाख रुपये भरण्याचा दंड ठोठावला आहे.

    हा एक लाखांचा दंड दोन आठवड्यांच्या आत तामिळनाडू चीफ मिनिस्टर कोविड-19 रिलीफ फंडमध्ये भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दोन आठवड्यात आत चुकवलेला कर देखील भरण्याचा आदेश देण्यात आलाय.

    अभिनेत्यांचे लाखो फॅन्स असतात. हे सगळे फॅन्स त्यांना खरे हिरो मानतात. एककीडे तामिळनाडू सारख्या राज्यात जिथे फिल्मी सितारे राज्याचा राज्यकारभार चालवणारे सुद्धा बनले आहेत, अशा राज्यात अभिनेत्यांकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी खºया हिरोप्रमाणे वागायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    Actor should act like a real actor, court slaps superstar Thalapati Vijay in  evasion case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य