याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता साहिल खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता साहिल खान अडचणीत आला आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने त्याला ताब्यात घेतले आहे. खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील भाग आहे.Actor Sahil Khan arrested in Mahadev Betting App case, Mumbai police take big action
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती. या अभिनेत्याने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
महादेव बुक बेटिंग प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. या अभिनेत्याला छत्तीसगडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे, तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.
या अभिनेत्यावर लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्याने भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. ॲपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच पोलीसांच्या तापासून आणखी अनेक मोठे पैलू समोर येऊ शकतात.
Actor Sahil Khan arrested in Mahadev Betting App case, Mumbai police take big action
महत्वाच्या बातम्या
- हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन
- उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!
- ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’
- कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!