विशेष प्रतिनिधी
मुंबई: अश्लिल चित्रपट बनविल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अध्यक्ष असलेल्या सतयुग गोल्डविरोधातील खटला अभिनेता सचिन जोशी याने जिंकला आहे.Actor Sachin Joshi wins lawsuit against Raj Kundra, gets gold worth Rs 18 lakh back
सचिन जोशी याने सतयुग गोल्डमध्ये १८ लाख ५७ हजार रुपये गुंतवून सोने खरेदी केले होते. त्याला २५ लाख रुपये मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ते न मिळाल्याने सचिन जोशीने न्यायालयात धाव घेतली होती.
सचिन जोशी याने तक्रारीत आरोप केला आहे की, सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपली फसवणूक केली होती. या कंपनीकडून त्याने एका सोन्याच्या योजनेत एक किलो किमतीचे सोने खरेदी केले होते. त्याबदल्यात २५ लाख रुपये मिळतील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे पैसे मिळाले नाहीत.
सचिन जोशी म्हणाला की, माझी कायदेशीर लढाई ही केवळ माझ्यासाठी नव्हती तर सतयुग गोल्डच्या कित्येक गुंतवणूकदारांसाठी होती. त्यांना सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले होते. मी स्वत: सहा वषार्पूर्वी 18,57,870 रुपये गुंतविले होते.
मात्र, हे पैसे मिळाले नाही. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला असून आम्हाला आमचे 1 किलो सोने परत मिळाले आहे. त्याचबरोबर कायदेशिर प्रक्रियेचा खर्च म्हणून तीन लाख रुपयांची भरपाईही मिळाली आहे.
Actor Sachin Joshi wins lawsuit against Raj Kundra, gets gold worth Rs 18 lakh back
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ
- फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट
- Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट
- गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन