विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पुन्हा राजकारणात पुढील शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेऊन अमोल कीर्तीकरांचा “राम नाईक” करण्याची तयारी!!… अभिनेता गोविंदाने 14 वर्षांच्या अंतराने पुन्हा राजकारणात प्रवेश केला. त्याने एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेना आता. त्याला वायव्य मुंबईतून उमेदवारी देऊन अमोल कीर्तीकरण विरोधात रणमैदानात उतरवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे गोविंदाला परत एकदा 2004 चा राजकीय चमत्कार करण्याची संधी आली आहे. actor govinda begin in political carrier after 14 years
2004 च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाने काँग्रेसच्या हाताच्या पंजावर निवडणूक लढवत भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा उत्तर मुंबई या त्यांच्या बालेकिल्ल्यातून पराभव केला होता. त्यावेळी राम नाईक हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री होते. परंतु गोविंदाच्या लोकप्रियतेपुढे राम नाईक यांची राजकीय मात्रा चालली नव्हती. त्यांना भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे राम नाईक यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा ब्रेक लागला. पण 2014 नंतर मात्र उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि ती त्यांनी उत्तम रीतीने निभावली.
गोविंदाने 2009 मध्ये राजकारणाला रामराम ठोकला परत तो अभिनय क्षेत्राकडे वळला त्यानंतर आता 14 वर्षांनी 2024 मध्ये आपण रामराज्यात प्रवेश करत आहोत, असे जाहीर करत त्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. गोविंदाला वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात तिकीट मिळण्याची शक्यता असून गोविंदाच्या लोकप्रियतेपुढे अमोल कीर्तीकरांचा “राम नाईक” होण्याची शक्यता आहे. अर्थात अमोल कीर्तिकर यांच्यापुढे फक्त गोविंदाचे आव्हान नसून ईडीचे देखील आव्हान आहे. कारण खिचडी घोटाळ्यात चौकशी आणि तपासण्यासाठी ईडीने त्यांना समन्स काढले आहे.
actor govinda begin in political carrier after 14 years
महत्वाच्या बातम्या
- निर्मला सीतारामन म्हणाल्या- माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत; आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूतून लढण्याचा पर्याय होता, पण मी नकार दिला
- काका – पुतण्याचे पक्ष वेगळे होऊनही “राष्ट्रवादी काँग्रेस” नावाच्या ब्रँडचे आकुंचनच!!
- Loksabha Election : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांना दिली उमेदवारी
- ‘तुरुंगातून दिल्ली सरकार चालणार नाही’ ; उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांचा केजरीवालांना धक्का!