• Download App
    पंतप्रधानांच्या साधेपणाने काशीतील कार्यकर्ते भारावले, स्टॉलवर थांबून मोदींनी घेतला चहा आणि केली चाय पे चर्चा|Activists in Kashi overwhelmed by PM's simplicity, Modi stopped at the stall and took tea and discussed

    पंतप्रधानांच्या साधेपणाने काशीतील कार्यकर्ते भारावले, स्टॉलवर थांबून मोदींनी घेतला चहा आणि केली चाय पे चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशीत प्रचारादरम्यान एका चहा स्टॉलवरुन थांबून चहा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ‘चहा पे चर्चा’ केली. यामुळे कार्यकर्ते भारावून गेले होते.
    मोदी वाराणसीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले. त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला.Activists in Kashi overwhelmed by PM’s simplicity, Modi stopped at the stall and took tea and discussed

    दरम्यान, काशीत एका चहाच्या दुकानात चहा पिण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. नरेंद्र मोदी यांनी एका सर्वसामान्य चहाच्या स्टॉलवर चहा घेतल्याने स्टॉल चालक आणि इतर कार्यकतेर्ही भारावले. त्यांनी मोदींच्या जयघोषाची घोषणाबाजी केली. जगभरात कामानिमित्ताने फिरणारे मोदी आज आपल्या दुकानापर्यंत आले या विचाराने चहा स्टॉल चालकाला गहिवरुन आलं.त्याने मोदींचं जल्लोषात स्वागत केले.



    प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचं पुन्हा एकदा दर्शन झालं. त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमोर ताफा बाजूला सारत चहा घेतला. यावेळी त्यांची कार्यकर्त्यांसोबत ‘चहा पे चर्चा’ झाली. यावेळी त्यांनी चहाच्या स्टॉलवरच्या आजोबांची विचारपूस केली.

    नरेंंद्र मोदी कार्यकर्त्यांसोबत सल्लामसलत करतानाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावर असलेला उत्साह खुलेपणाने दिसत होता. यावेळी मोदी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मनभरुन बोलताना दिसले. कार्यकर्ते आपल्या नेत्याजवळ इतक्याजवळ बसून मनातलं सारं काही बोलले.

    नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना दिसत आहे. एक कार्यकर्ता मोदींना काहीतरी विनंती करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मोदी संयमाने त्याचं बोलणं ऐकूण घेताना दिसत आहेत. तर इतर कार्यकर्ते देखील दोघांकडे बघत आहेत.

    Activists in Kashi overwhelmed by PM’s simplicity, Modi stopped at the stall and took tea and discussed

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे