Wednesday, 7 May 2025
  • Download App
    वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाहवर कारवाई! Action taken against main accused in Worli hit and run case Mihir Shahwar

    वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाहवर कारवाई!

    न्यायालयाने सुनावली१६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी Action taken against main accused in Worli hit and run case Mihir Shahwar

     विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला बुधवारी मुंबई न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी, अपघातानंतर दोन दिवसांनी मिहीर पोलिसांनी मंगळवारी मुंबईजवळ अटक केली होती. मिहीर शाह हा शिवसेना नेते राजेश शाहा यांचा मुलगा आहे.

    मद्यधुंद अवस्थेत असताना मिहीरने भरधाव वेगाने बीएमडब्ल्यू चालवत एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा पती जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मंगळवारी मिहीर शाहला मुंबईजवळून अटक केली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की मिहीर शाहचे वडील राजेश शाह यांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी सक्रिय भूमिका बजावली होती आणि त्यांनी चालवलेली बीएमडब्ल्यू कार घटनास्थळावरून हटवण्याची योजनाही आखली होती.

    रविवारी पहाटे मिहीर शाह जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसोबत पार्टी करून बाहेर गेला होता आणि भरधाव वेगाने गाडी चालवत असताना त्याने स्कूटरला धडक दिली. कावेरी नाखवा (४५) आणि प्रदीप नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य स्कूटीवरून जात होते. या अपघातात कारने चिरडल्याने कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रदीप नाखवा गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर मिहीर फरार झाला होता.

    Action taken against main accused in Worli hit and run case Mihir Shahwar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील कोणती 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली?

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- भारतात आरक्षण रेल्वेच्या डब्यासारखे; आत असलेल्यांना वाटते इतरांनी आत येऊ नये

    PM Modi : पाकिस्तानवर एअर स्ट्राइकपूर्वी PM म्हणाले होते- भारताचे पाणी भारतासाठी वाहणार