येत्या पाच वर्षात भ्रष्टाचाऱ्यांना आणखी कठोर शिक्षा होईल, असा सूचक इशाराही दिला.
विशेष प्रतिनिधी
लोहरदगा : झारखंडमधील पलामूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरदगा येथे आरक्षणापासून भ्रष्टाचारापर्यंतच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडले. यासोबतच त्यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरही निशाणा साधला. चोरी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे ते म्हणाले. यासोबतच भ्रष्टाचार हटवणे हे आमचे ध्येय आहे, मात्र विरोधी पक्षांचे मिशन भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
येत्या पाच वर्षात भ्रष्टाचाऱ्यांना आणखी कठोर शिक्षा होईल, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. गरिबांसाठी मोफत रेशन योजनेमुळे काँग्रेस आज त्रस्त आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र गरिबांसाठी मोफत रेशन योजना सुरूच राहील ही मोदींची गॅरंटी आहे.
काँग्रेसने लोहरदगा, खुंटी या आदिवासी भागांना मागास म्हटले होते पण आम्ही त्याला महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हटले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अशा क्षेत्रांचा विकास करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मी जिवंत असेपर्यंत दलित आणि आदिवासींच्या हितासाठी काम करत राहीन, असेही ते म्हणाले.