• Download App
    उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई; अयोध्येचा नकाशा काढण्यास गेलेल्या खलिस्तानी समर्थकांना पकडले|Action by Uttar Pradesh ATS; Khalistani supporters who went to draw the map of Ayodhya were arrested

    उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई; अयोध्येचा नकाशा काढण्यास गेलेल्या खलिस्तानी समर्थकांना पकडले

    वृत्तसंस्था

    अयोध्या : राम मंदिराचा नकाशा मिळवण्यासाठी अयोध्येत गेलेल्या तीन संशयितांना उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली. यापैकी दोघे राजस्थानच्या सिकरचे, तर तिसरा झुंझुनचा आहे. शंकरलाल, प्रदीपकुमार व अजितकुमार अशी त्यांची नावे आहेत.Action by Uttar Pradesh ATS; Khalistani supporters who went to draw the map of Ayodhya were arrested

    ते खलिस्तान समर्थक सुखबीरसिंग आणि पन्नू टोळीशी संबंधित असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पन्नू टोळीने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगींना धमकी दिली होती. शंकरलाल काही दिवसांपूर्वी तुरुंगात होता. तिथे त्याची ओळख लखविंदरशी झाली.



    तुरुंगातून बाहेर आल्यावर शंकरलाल लखविंदरचा पुतण्या पम्माला भेटला. त्याने कॅनडातील सुखविंदरचा नंबर दिला. तेव्हापासून या दोघात व्हॉट्सअॅपवर संवाद सुरू झाला. तिन्ही आरोपी या टोळीशी संबंधित असल्याचे समजते. 1 जुलै 2020 रोजी केंद्र सरकारने पन्नूला दहशतवादी घोषित केले होते.

    कुख्यात खलिस्तानी अतिरेकी संघटना शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरुपतवंतसिंग पन्नू याला अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. तो त्याचा फायदा घेऊन कायम भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम करत असतो.

    Action by Uttar Pradesh ATS; Khalistani supporters who went to draw the map of Ayodhya were arrested

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!