वृत्तसंस्था
बंगळुरू : धोतर, नेहरु शर्ट घालून आलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणाऱ्या बंगळुरूचा मॉल ७ दिवस बंद ठेवण्याची कारवाई कर्नाटक सरकारने केली. हावेरी जिल्ह्यातील फकीरप्पा या शेतकऱ्याला व त्याच्या पत्नीला त्यांचा बंगळुरूत शिकणारा मुलगा मंगळवारी जीटी वर्ल्ड मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र, धोतर घातलेल्या फकीरप्पा यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गेटवर रोखले व पँट घालून येण्याचा सल्ला दिला. याची गंभीर दखल घेत सरकारने शेतकऱ्याचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत मॉल ७ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले.Action against mall for denying entry to dhoti-wearing farmer; Punishment to keep Bangalore mall closed for 7 days
बंगळूरमधील या प्रकरणात बुधवारी भारतीय न्याय संहिताच्या (BNS) कलम 126(2) (चुकीचा संयम) अंतर्गत शॉपिंग मॉलचा मालक आणि मॉलच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही ‘इंडिया टुडे’ने दिल्याची माहिती आहे.
बंगळूरच्या जीटी मॉलमध्ये नेमकं काय घडलं?
चित्रपटाचे तिकीट असूनही वृद्ध शेतकरी फकीरप्पा आणि त्यांच्या मुलाला मगडी मेन रोडवरील मॉलच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.
सुरक्षा कर्मचाऱ्यांना आत जाऊ देण्याची विनंती करणारी वृद्ध व्यक्ती आणि त्याचा मुलगा यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर संपूर्ण शहरात या घटनेविरुद्ध संतापाची लाट उसळली.
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातून हा शेतकरी आपल्या मुलाला भेटण्यासाठी बेंगळूरला आला होता. यानंतर तो त्याच्या मुलासह मॉलमध्ये आला होता. दरम्यान व्हायरल व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचे बोलणे ऐकू येत आहे. संबंधित सुरक्षा रक्षक मॉलच्या नियम आणि धोरणात धोतर परिधान केलेल्या व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करतो.
तो वृद्ध आणि त्याच्या मुलाने मॉलमधील सुरक्षारक्षकांना विनवण्या करूनही सुरक्षा कर्मचारी माघार घेत नाहीत. मॉलमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्याने पॅन्टमध्ये बदल करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.