विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रविरोधी माहिती आणि खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने २० यूट्यूब वाहिन्या आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.Action against 20 YouTube channels and two websites for broadcasting anti-national information
यूट्यूबवरील २० वाहिन्या पाकिस्तानातून चालवल्या जात असून त्यांद्वारे भारतासंबंधी संवेदनशील विषयांबाबत चुकीची आणि तथ्यहीन माहिती आणि बातम्या प्रसारित केल्या जातात. काश्मीर प्रश्न, भारतीय सैन्य, अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर,
जनरल बिपिन रावत यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भावना भडकवणारी आणि दिशाभूल करणारी माहिती या वाहिन्या व संकेतस्थळांवरून देण्यात येत असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे माहिती प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी सांगितले.
या वाहिन्या व संकेतस्थळे लोकशाहीविरोधी असून दोन समाजात हिंसाचार घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. समाजात भीती निर्माण करणे आणि गोंधळ माजवण्याचा त्यांचा उद्देश असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकूर यांनी सांगितले.माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून भारतविरोधी शक्तींना आळा बसवण्यासाठीच ही कारवाई केल्याचे ठाकूर म्हणाले.
भारतात अशांतता पसरवण्याचा देशाबाहेरील शक्तींचा प्रयत्न आहे. असत्य आणि तथ्यहीन माहिती आणि वृत्त प्रसारित करून इंटरनेटवरील काही वाहिन्या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.
Action against 20 YouTube channels and two websites for broadcasting anti-national information
महत्त्वाच्या बातम्या
- तालीबानने चुकून आठ लाख डॉलर्स केले शत्रुराष्ट्र ताजिकीस्थानला हस्तांतरीत, गंभीर आर्थिक संकटात झाली चूक
- प्रयागराज मातृशक्तीचे प्रतिक, महिलांच्या विकासासाठी झालेले उत्तर प्रदेशातील काम देश पाहतोय, पंतप्रधानांनी योगी आदित्यनाथ यांचे केले कौतुक
- चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना ५० हजार रुपये दंड
- अरविंद केजरीवाल गोव्यात आले… इथल्या राजकीय नेत्यांना “थर्ड क्लास” म्हणाले!!
- राज्यात लोकशाही बंद, केवळ ‘रोक’शाही किंवा ‘रोख’शाही सुरू, देवेंद्र फडणवीसांची झंझावाती पत्रकार परिषद, वाचा सविस्तर..