वृत्तसंस्था
लखनऊ : लखनऊमध्ये बुधवारी सकाळी एका माथेफिरू तरुणाने NEETच्या विद्यार्थीनीवर ॲसिड फेकले. विद्यार्थिनी तिच्या भावासोबत NEET काउंसिलिंगला जात होती. तिला वाचवताना विद्यार्थिनीचा भाऊही भाजला. चौक परिसरातील लोहिया पार्कजवळ सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.Acid attack on NEET student in Lucknow; Half of his face was burnt, doctor brother was also injured while saving
पोलिसांनी भाऊ आणि बहिणीला केजीएमयूमध्ये नेले. दोघांना प्लास्टिक सर्जरी वॉर्डात हलवण्यात आले आहे. विद्यार्थीनीचा भाऊ केजीएमयूमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.
विद्यार्थीनीचे वडील शरद तिवारी हे व्यापारी मंडळाचे अधिकारी असून ते चौक परिसरात व्यवसाय करतात. काका संदीप तिवारी हे भाजपमध्ये मंडल उपाध्यक्ष आहेत. अमन वर्मा असे आरोपीचे नाव आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपी अमन वर्मा काही दिवसांपासून विद्यार्थिनीला फोन करून त्रास देत होता.
मुलीच्या चेहऱ्याचा एक भाग गंभीररित्या भाजला
केजीएमयूच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.विजय कुमार यांनी सांगितले की, मुलीच्या चेहऱ्याचा एक भाग गंभीरपणे भाजला आहे. तर तिच्या भावाच्या पाठीवर वाईट परिणाम झाला आहे. या दोघांवर मलमपट्टी केल्यानंतर त्यांना सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
मुलीचे काका मनोज मिश्रा यांनी सांगितले की, मुलगी तिच्या चुलत भावासोबत वैद्यकीय महाविद्यालयात समुपदेशनासाठी जात होती. लोहिया पार्कजवळ पोहोचताच एक मुलगा आला आणि त्याने पिशवीतून ॲसिड काढून फेकले. घटनेच्या वेळी चुलत भाऊ हर्ष तिवारी याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. हर्षची पाठ भाजली आहे. मुलीचा अर्धा चेहरा भाजला. आरोपी हा चौपटिया येथील रहिवासी आहे.
आधी बोलला, मग निघून गेला
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले – सकाळी आठच्या सुमारास विद्यार्थिनी तिच्या भावासोबत लोहिया पार्कजवळ उभी होती. दरम्यान, एक तरुण तिच्याजवळ आला आणि तिच्याशी बोलला. यानंतर हा तरुण तेथून निघून गेला. काही वेळाने परत आला. त्याच्या हातात ॲसिडची बाटली होती. ॲसिड फेकताच विद्यार्थिनीचा भाऊ पुढे आला, त्यामुळे तोही भाजला.
Acid attack on NEET student in Lucknow; Half of his face was burnt, doctor brother was also injured while saving
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया, म्हणाले- हायकमांडचा निर्णय…
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; गट ‘क’च्या रिक्त पदांची भरती MPSC मार्फत; पेपरफुटीचा कायदाही येणार
- अग्निवीराबाबत राहुल गांधींनी लोकसभेत चालविला नॅरेटिव्ह खोटा; पण शहीद अग्निवीराच्या वडिलांनी सांगितला मदतीचा आकडा!!
- ‘राहुल गांधींनी माफी मागावी… संपूर्ण संत समाज..’ ; स्वामी अवधेशानंद संतापले!