• Download App
    प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया, म्हणाले...|Acharya Satyendra Das the chief priest of Ram Janmabhoomi after the Ayodhya ceremony

    प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

    अभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर आज राम मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात अयोध्या तसंच संपूर्ण देश आपल्या लाडक्या प्रभू रामाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसत होता. रामनामाचा जयघोष आणि जय श्री रामचा जयघोष सर्वत्र ऐकू येत होता. रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, “अयोध्या नगरी दिव्य दिसत आहे, यावेळी त्रेतायुगाची झलक पहायला मिळत आहे.’Acharya Satyendra Das the chief priest of Ram Janmabhoomi after the Ayodhya ceremony



    अयोध्या भाविकांच्या जथ्थ्यांनी भरलेली आहे. अनेक लोक येथे दर्शनासाठी उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी आज सगळ्यांना दर्शन घेता येणार नाही. 4000 संतांचा समूहही आला आहे. आज अयोध्या नगरी वैभवशाली दिसत आहे.

    22 जानेवारीला अभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर मंगळवारी राम मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले. सकाळी सात वाजण्यापूर्वी रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आपल्या लाडक्या प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी 7 ते 11:30 आणि दुपारी 2 ते 7 या वेळेत भाविकांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे.

    Acharya Satyendra Das the chief priest of Ram Janmabhoomi after the Ayodhya ceremony

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Hyderabad : हैदराबादेत मंदिरात तोडफोड, दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी जखमी, भाजपने म्हटले- हिंदू आणि मंदिरांना लक्ष्य केले जात आहे

    West Bengal : ED अधिकाऱ्यांवरील FIR ला SCची स्थगिती, I-PAC छापा प्रकरणात म्हटले- संस्थेच्या कामात अडथळा आणू नका, ममता सरकारला नोटिस

    Guru Prakash Paswan : भाजपने म्हटले-राहुल गांधी फुटीरतावादी राजकारणाचे उदाहरण; राज्यानुसार राजकारण बदलते