• Download App
    Hanuman Jayanti Riots : जहांगीरपुरी दंगलीच्या आरोपीने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात नेताना दाखविली “पुष्पा”ची मस्ती!!|Accused in Jahangirpuri violence case being taken to Rohini court

    Hanuman Jayanti Riots : जहांगीरपुरी दंगलीच्या आरोपीने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात नेताना दाखविली “पुष्पा”ची मस्ती!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – हनुमान जयंतीला दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात मिरवणूकीवर दगडफेक करून दंगल घडविणाऱ्या २० आरोपींना पोलीसांनी पकडून ताबडतोब कोर्टाच्या आदेशानुसार कस्टडीत घेतले असले, तरी या आरोपींची अजून मस्ती शमली नसल्याचेच स्पष्ट होत आहे.Accused in Jahangirpuri violence case being taken to Rohini court

    पोलीसांनी ९ आरोपींना आज पकडून जेव्हा रोहिणी कोर्टात हजर केले, तेव्हा कोर्टात नेतानाचा एका आरोपीने आपल्या अंगात अजूनही “पुष्पा”ची मस्ती असल्याचे दाखवून दिले. या आरोपीला पोलीस रोहिणी कोर्टात नेत असल्याचा एक विडिओ एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.



    या विडिओत या आरोपीला अन्य आरोपींसह हातात बेड्या घालून पोलीस रोहिणी कोर्टात नेत असताना तो आपल्या नसलेल्या दाढीवरून “पुष्पा”सारखा हात फिरवताना दिसत आहे. या आरोपीने एकदा नव्हे, तर दोनदा “पुष्पा”ची मस्ती दाखविणारी ऍक्शन केल्याचे या विडिओत दिसत आहे.

    रोहिणी कोर्टाने अफजल आणि अन्सार या दोन आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देऊन बाकीच्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीसांनी एका दिवसात २० आरोपींची ओळख पटवून त्यांना कोर्टात हजर केले होते. त्यांच्याकडून पोलीसांनी ३ पिस्तुले आणि ५ तलवारी जप्त केल्या आहेत. तसेच पोलीसांनी आज सायंकाळच्या सुमारास जहांगीरपुरी भागात गाड्यांवरून पेट्रोलिंग केले.

    Accused in Jahangirpuri violence case being taken to Rohini court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार