• Download App
    वाझे, शर्माच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीने परमबीर सिंह अडचणीत, अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या मोटारीतील स्फोटकांचा अतिरेक्यांशी संबंध जोडण्याचा कट|According to information from Waze, Sharma's investigation, Parambir Singh is in trouble,

    वाझे, शर्माच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीने परमबीर सिंह अडचणीत, अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या मोटारीतील स्फोटकांचा अतिरेक्यांशी संबंध जोडण्याचा कट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे निलंबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याच्याकडून तपासात मिळालेल्या माहितीमुळे अडचणीत आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर ठेवलेल्या मोटारीतील स्फोटके ही अतिरेकी संघटनेकडून ठेवण्यात आल्याचा परमबीर सिंह यांच्या सूचनेनुसार रचण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आहे. त्यांच्या सांगण्यावरून सचिन वाझेने इतरांच्या मदतीने तसा बनाव रचला होता.According to information from Waze, Sharma’s investigation, Parambir Singh is in trouble,

    २५ फेब्रुवारीला कार मायकेल रोडवरील अंबानी यांच्या अंटेलिया बंगल्यापासून ३०० मीटर अंतरावर हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या व धमकीचे पत्र आढळून आले होते. त्या वेळचा सीआययूचा प्रमुख असलेल्या वाझेकडे त्याचा तपास होता. या घटनेचा संबंध दहशतवादाशी जोडण्यात आला.



    याबाबत कटही आखण्यात आला होता. मात्र, यामध्ये सहभागी होण्यास वाझे याचा मित्र आणि वाहतूक व्यावसायिक मनसुख हिरेन याने नकार दिला. या प्रकरणात अटक करून घेण्यासाठी वाजे त्याच्यावर दबाव आणत होता. त्यामुळे सुपारी देऊन मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. या हत्येच्या प्रकरणात तपासात वाझे याचे नाव समोर आले.

    त्यातूनच हा कट उघडकीस येऊन बनावट दहशतवादी संघटनेचा बनाव उघड झाला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डी गँगशी संबंधित सुभाष सिंग ठाकूरने सचिन वाझेच्या सांगण्यावरून एका मध्यस्थीच्या माध्यमातून यूएई येथील सर्व्हरवरून सोशल मीडियावर मेसेज पाठवला.

    त्यासाठी मोबाइल फोन तिहार जेलमधील इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याच्याकडे पोहोचविण्यात आला. त्यावर यूएईचा सर्व्हर सेट करण्यात आला. हा मेसेज पाठविण्याकरिता टेलिग्राम या सोशल मीडियावर जैश-उल-हिंद नावाने एक ग्रुप बनवला गेला होता. पण, याचदरम्यान या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून एनआयएकडे वर्ग झाला.

    या प्रकरणात एनआयएने परमबीर सिंह यांची केवळ एकदाच चौकशी केली आहे. ७ एप्रिलला पेडर रोड येथील कार्यालयात सुमारे ४ तास चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर प्रदी शर्मासह अनेकांना अटक झाली. त्यामुळे आता परमबीर सिंह यांचीही पुन्हा चौकशी होणार आहे.

    According to information from Waze, Sharma’s investigation, Parambir Singh is in trouble,

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार