• Download App
    यमुनानगर – पंचकुला महामार्गावर भीषण अपघात; आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू, १५ पेक्षा अधिकजण जखमी! Accident on Yamunanagar Panchkula highway Eight people died on the spot more than 15 seriously injured

    यमुनानगर – पंचकुला महामार्गावर भीषण अपघात; आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू, १५ पेक्षा अधिकजण गंभीर जखमी!

    अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बसचा अक्षरशा चुराडा झाला आहे

    विशेष प्रतिनिधी

    हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यातील कक्कड मांजरा गावाजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. ट्रक आणि बस यांची जोरदार टक्कर झाल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर १५ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. बसमधील प्रवशांमध्ये बहुतांशजण हे रस्ता कामावरील मजूर होते.  Accident on Yamunanagar  Panchkula highway Eight people died on the spot more than 15 seriously injured

    प्राप्त माहितीनुसार हा अपघात यमुनानगर – पंचकुला महामार्गावरील कक्कड मांजरा गावाजवळ घडला. जेव्हा बस उत्तर प्रदेशमधील बरेली येथून हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे जात होती. अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसचा अक्षरशा चुराडा झाला. तर आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. शिवाय अनेकजण जखमीही झाले. अपघाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व मदत कार्य सुरू झाले.

    अपघातामधील मृतांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. बसमधील काही प्रवासी कक्कड मांजरा येथे उतरले होते, त्यानंतर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. अपघातमधील जखमींना अंबाला सिटी आणि नारायणगढ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Accident on Yamunanagar  Panchkula highway Eight people died on the spot more than 15 seriously injured

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला