• Download App
    अबू आजमी उतरला औरंग्याच्या समर्थनात; म्हणे, औरंगजेब होता धर्मनिरपेक्ष राजा!!|Abu Azmi came down in support of Aurangya; Say, Aurangzeb was a secular king!!

    अबू आजमी उतरला औरंग्याच्या समर्थनात; म्हणे, औरंगजेब होता धर्मनिरपेक्ष राजा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंग्याच्या औलादींची पैदास झाली आहे. नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचवल्यानंतर कोल्हापुरात औरंग्याच्या औलादींनी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी औरंगजेबाचे मोबाईल स्टेटस ठेवले. त्यानंतर हिंदुत्ववाद्यांचा संताप संपूर्ण महाराष्ट्रभर उसळला असताना मुंबईतून आणखी एक औरंग्याची औलाद त्याच्या समर्थनार्थ उतरली आहे. समाजवादी पार्टीचा आमदार अबू अशी मागणी याने औरंग्याचे समर्थन केले आहे. औरंगजेबाचे समर्थन करताना त्याला धर्मनिरपेक्ष राजा असल्याचे बिरूद बहाल केले आहे.Abu Azmi came down in support of Aurangya; Say, Aurangzeb was a secular king!!

    या ट्विटमध्ये अबू असीम आजमी म्हणतो :

    मी औरंगजेब रहमतुल्ला अलैहच्या साथीला आहे. त्याचा इतिहास जाणून घेतला तर तुम्हाला हे लक्षात येईल की औरंगजेब धर्मनिरपेक्ष राजा होता. त्याने अफगाणिस्तान पासून बर्मापर्यंत आपले राज्य फैलावले. अनेक हिंदू – मुस्लिम राजांनी सत्तेसाठी वेगवेगळे निर्णय घेतले. पण आज त्याला धार्मिक रंग दिला जात आहे आणि त्यामध्ये गोदी मीडिया कारणीभूत आहे.



    छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दस्तुरखुद्द शरद पवारांनी आपण छत्रपती संभाजी नगर शहराला त्या नावाने संबोधणार नाही, तर औरंगाबाद नावानेच संबोधणार, असे म्हटले आहे.

    औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा नागपूरातून इशारा!!

    महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. ते कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही कायदा हातात घेऊ नये. सरकार औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही.

    कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

    औरंगजेबाचे उदात्तीकरण झाले तर संताप येणे स्वाभाविक आहे.

    पण महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये. औरंगजेबाचे उदात्तीकरण सरकार सहन करणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

    Abu Azmi came down in support of Aurangya; Say, Aurangzeb was a secular king!!

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य