विशेष प्रतिनिधी
दिल्ली : 25 वर्षांपूर्वी जेव्हा ते विमला कॉलेजमध्ये कोच म्हणून काम करायचे. ट्रेनिंग साठी जाताना ते आपल्या सोबत काही पुस्तके घेऊन जायचे. आपल्या ट्रेनिंग सेशनदरम्यान पुस्तकं घेऊन येणारा हा कोच अगदीच निराळा आहे. अँथलिट जर्नल्स, कोचिंग बुक्स फॉर कोच अशी बुक्स ते आपल्या स्टुडंट्सना वाचून दाखवायचे. कारण ट्रेनिंग फक्त कोचिंगचा भाग नसून एका सायंटिफिक अप्रोचने खेळाकडे पाहण्यात यावे हा आग्रह त्यांचा होता. तर आपण बोलतोय द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते टी पी असिफ यांच्या बद्दल.
About Dronacharya Award winner TP Usaif
नुकत्याच द्रोणाचार्य अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले टी पी असिफ यांच्याबद्दल सांगताना वर्ल्ड चॅम्पियनशिप ब्राँझ मेडलिस्ट अंजू बॉबी जॉर्ज सांगते, विमला कॉलेजमध्ये मी एक वर्ष त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतले होते. मी, बॉबी आणि लेखा आम्ही तिघीही विनर खेळाडूंनी त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलेले आहे. ते आम्हाला आमच्या वडिलांसारखे आहेत. ट्रेनिंगदरम्यान त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक वैज्ञानिक दृष्टीकोन होता. आणि तीच दृष्टी ते आम्हाला समजवण्याचा प्रयत्न नेहमी करायचे. प्रत्येक गोष्टीमागे कोणता तरी हेतू आहे. तो हेतू त्या गोष्टीची संपूर्ण माहिती पूर्णपणे एक्सप्लेन करून ते दाखवायचे. आणि त्यांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचे डेडीकेशन. त्यांचे कामाबद्दल असणारे पॅशन. जे आजही अजिबात कमी झालेले नाहीये. असे अंजू सांगते.
75 वर्षीय माजी इंडियन एयर फाेर्स अॅथलीट यांनी जवळपास मागील 43 वर्षापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जंपर्सना प्रशिक्षण दिले आहे.
ते मूळचे केरळमधील इरिंगगोल इथले. इंडियन एअर फोर्स कडून लाँग जंप आणि ट्रिपल जम्प हे खेळ ते खेळायचे. 1978 मध्ये त्यांनी एअर फोर्स साठी कोच म्हणून काम करण्यास सुरूवात केली. 1981 साली त्यांना स्पोर्ट्स काऊंसिलचे कोच म्हणून जी व्ही राजा स्पोर्ट्स स्कूल जे तिरुवनंतपुरम येथे आहे तिथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. याच काळामध्ये त्यांनी माजी आंतरराष्ट्रीय विजेती जंपर एस मुरली हिला ट्रेन केले होते.
त्रिशूरमधील विमला कॉलेजमध्ये देखील त्यांनी कोच म्हणून काम केले होते. आणि याच काळामध्ये त्यांनी अंजू, बॉबी आणि लेखा थॉमस या इंटरनॅशनल विनर्सने ट्रेन केले हाेते.
1994 ते 1998 या काळामध्ये त्यांनी राष्ट्रीय जंप कोच म्हणून काम केले. त्याआधी त्यांनी अल्फान्सो कॉलेज पाला येथेदेखील कोच म्हणून काम केले होते.
स्पोर्ट्स काऊन्सिल येथून रिटायर झाल्यानंतर त्यांनी मार अथानासियोस कॉलेज कोथामानगर्ल येथे 16 वर्ष कोच म्हणून काम केले. 2019 रोजी ते तेथून रिटायर्ड झाले. नंतर त्यांनी ख्रिस्त कॉलेज मध्ये काम करण्यास सुरूवात केली. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये जास्तीत जास्त मेडल जिंकण्यावर त्यांनी सध्या आपले लक्ष केंद्रित केले आहे.
About Dronacharya Award winner TP Usaif
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी