• Download App
    विजयादशमी स्पेशल : बंगाली ‘सिंदूर खेला’ आणि केरळचे ‘विद्यारंभम’ | About Bengali Sindoor Khela and Kerala's Vidyarambham festival

    विजयादशमी स्पेशल : बंगाली ‘सिंदूर खेला’ आणि केरळचे ‘विद्यारंभम’

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : भारत देशाला सणांचा, रंगाचा, बॉलिवूडचा देश म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यापासून सणांची गडबड प्रत्येक घराघरात पाहायला मिळते. वर्षभर भारतात कोणते ना कोणते सण साजरे केले जातातच.

    About Bengali Sindoor Khela and Kerala’s Vidyarambham festival

    आज विजयादशमी आहे. नवरात्रीतील शेवटचा दिवस. महाराष्ट्रात हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो तर देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गा पूजेचा शेवटचा दिवस सिंदूर खेला म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया पारंपरिक व्हाईट अँड रेड बॉर्डर असलेली बंगाली साडी नेसतात. दुर्गा मातेच्या मंदिरात एकत्र जमतात आणि तिथे सिंदूर खेला एकत्रित पणे साजरा  करतात. एकमेकींच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर कुंकू म्हणजे हिंदीत सिंदूर लावतात.


    श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे भक्तांना ऑनलाइन दर्शन;  अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर सजले


    झारखंड मधील स्त्रियांनी देखील हा सण ह्या वर्षी साजरा केला आहे. Ani च्या ऑफिशियल ट्विटर पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या मध्ये स्त्रिया कुंकू लावून पारंपरिक संगीताच्या तालावर डान्स करताना दिसून येत आहेत.

    तर आजचा दिवस केरळ मध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करताना. ‘विद्यारंभम’ असे या सणाचे नाव आहे. या दिवशी सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. त्या नंतर विद्येची देवता सरस्वतीची पूजा केली जाते. आजच्या दिवशी लहान मुलांना अक्षरांची ओळख करून दिली जाते. दोन ते चार वर्षांच्या मुलाला शिक्षणाच्या जगाशी ओळख करून दिली जाते.

    हिंदू धर्मानुसार, 16 संस्कार आहेत जे एखाद्या व्यक्तीने त्याचा जन्म आणि मृत्यू दरम्यान पार पाडणे आवश्यक असते. विद्यारंभम हा असाच एक संस्कार आहे. लहानपणापासूनच मुलाच्या मनात अभ्यासासाठी उत्साह वाढवणे हा या सोहळ्याचा उद्देश आहे. हा संस्कार पालकांच्या मुलांच्या वाढीबरोबर त्यांना ज्ञान देण्याच्या जबाबदारीवर देखील प्रकाश टाकतो.

    ANI ने त्यांच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेजवर केरळमधील दक्षिणा मुकाम्बिका मंदिरामधील ह्या विधीचे काही फोटोज शेअर केले आहेत. हे मंदिर एर्नाकुलम येथे आहे.

    About Bengali Sindoor Khela and Kerala’s Vidyarambham festival

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!