विनायक ढेरे
भारतीय नौदलाच्या इतिहासात आज फार मोठा अभिमान दिवस ठरला आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर भारतीय नौदलाने ब्रिटिश गुलामी हटवून आपले नवे निशाण आज धारण केले आहे. या नव्या निशाणावर छत्रपती शिवाजी महाराज यांची अष्टकोनी राजमुद्रा अंकित करून भारतीय नौदलाने छत्रपतींच्या द्रष्ट्या नेतृत्वाला सलामी दिली आहे!! Abolished slavery, introduced new landmarks; Honored Chhatrapati
हिंदुस्थानचे पहिले आरमार उभारणारे छत्रपती
मध्ययुगीन आणि आधुनिक भारताच्या इतिहासात नौदलाचे सामर्थ्य आणि महत्व ओळखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले हिंदू सम्राट होते. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करून त्यांनी आपल्या साम्राज्याच्या संरक्षणासाठी पश्चिम किनाऱ्यावर मजबूत नौदल उभे केले होते. भारतावर आक्रमण झाले तर ते पश्चिमेकडून होईल. भारत भूमीचे या आक्रमणापासून संरक्षण करायचे असेल तर सागरी किल्ले मजबूत केले पाहिजेत. बळकट नौसेना उभी केली पाहिजे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची विशाल दृष्टी होती. त्या दृष्टीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्याचे मजबूत नौदल उभे केले. त्यामध्ये 60 युद्ध नका आणि 5000 नौसैनिक होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा
भारतीय नौदलाने आज आपले निशाण चिन्ह बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान कार्याला नमन केले आहे. नव्या निशाण चिन्हात ब्रिटिशांचा सेंट जॉर्ज क्रॉस नाही. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोनी सुवर्ण राजमुद्रा आहे. विशाल सागराचा निळा रंग, त्यावर नांगर आणि त्याखाली वरूण देवतेची प्रार्थना “शं नो वरूण:” हा त्रैअक्षरी मंत्र अंकित आहे.
गुलामीचे चिन्ह मिटवण्याचा निर्धार
भारतीयांच्या मनात किंवा भारतीय सन्मान चिन्हांवर जिथे – जिथे छोटी जरी गुलामीची छाप असली किंवा गुलामीचे चिन्ह असले तरी ते पुसून टाकण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदींनी याचा उच्चार केला आहे आणि याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश काळातले नौसेनेचे चिन्ह बदलून त्यावरचा “सेंट जॉर्ज क्रॉस” काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करत त्यांची अष्टकोनी राजमुद्रा असलेले नवे निशाण चिन्ह भारतीय नौसेनेने धारण केले आहे.
वाजपेयींनी हटविले होते गुलामी चिन्ह, पण…
वास्तविक 2001 मध्ये वाजपेयी सरकार असताना नौसेनेचे निशाण चिन्ह बदलून त्यावरचा सेंट क्रॉस जॉर्ज हटविण्यात आला होता परंतु 2004 मध्ये वाजपेयी सरकार पायउतार झाल्यानंतर सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जे युपीए सरकार आले त्या युपीए सरकारने नऊ दलाच्या निशान चिन्हावर पुन्हा सेंट क्रॉस जॉर्ज आणला होता. मात्र आता तो मोदी सरकारने कायमचा काढून टाकला आहे.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना भारतीय नौदलाने हे दमदार पाऊल उचलले आहे आणि त्याला देखील भारतात बनलेली सर्वात मोठी विशाल विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट हिच्या प्रत्यक्ष कमिशनिंगचा कार्यक्रमाचा सुवर्णपट लाभला आहे.
Abolished slavery, introduced new landmarks; Honored Chhatrapati
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव : 4 दिवसांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ पडली 58 मते, भाजपचे वॉकआउट
- GST Collection : गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कर संकलनात 28% वाढ; महाराष्ट्र टॉपवर, 1.44 लाख कोटींचे कलेक्शन
- बुलेट ट्रेन आता महाराष्ट्रात सुसाट; बीकेसीतील 10000 कोटींची जमीन देणार!!
- पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी!!; करा ऑनलाईन अर्ज!!