• Download App
    Abhishek Banerjee ममता बॅनर्जींशी मतभेदांच्या चर्चांवर अभिषेक बॅनर्जींनी

    Abhishek Banerjee : ममता बॅनर्जींशी मतभेदांच्या चर्चांवर अभिषेक बॅनर्जींनी अखेर सोडलं मौन, म्हणाले….

    काय म्हणाले ते जाणून घ्या? ; येणाऱ्या काळात मी अशा लोकांना ओळखत राहीन, असंही अभिषेक बॅनर्जींनी म्हटले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: Abhishek Banerjee तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मंगळवारी पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आणि त्यांच्याप्रती असलेली निष्ठा पुन्हा व्यक्त केली. पक्षाच्या अधिवेशनात बोलताना ते म्हणाले, “मी तृणमूल काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक आहे आणि माझ्या नेत्या ममता बॅनर्जी आहेत.”Abhishek Banerjee

    भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चा फेटाळून लावताना ते म्हणाले, “मी भाजपमध्ये सामील होत आहे असे म्हणणारे खोट्या अफवा पसरवत आहेत. जरी माझे शीर धडा वेगेळे केले तरी मी ‘ममता बॅनर्जी जिंदाबाद’ म्हणेन. आजकाल ज्या काही बातम्या येत आहेत त्या पूर्णपणे खोट्या आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत हे मला माहिती आहे.’’
    तसेच ‘’पक्षाच्या सदस्यांना अंतर्गत संघर्षांऐवजी सार्वजनिक सेवेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करताना बॅनर्जी म्हणाले, “तुमचे मतभेद विसरून लोकांसाठी काम करण्यावर लक्ष केंद्रित करा. षड्यंत्रांमध्ये सामील होण्यात काही अर्थ नाही. व्हॉट्सअॅप ग्रुप राजकारणात सहभागी असलेल्यांनी हे लक्षात ठेवावे की असे प्रयत्न व्यर्थ ठरतील. याचा परिणाम आपोआपच कट रचणाऱ्यांवर होईल.”’’

    त्यांनी सांगितले की, मागील निवडणुकांप्रमाणेच ते पक्षातील गद्दारांना उघड करत राहतील. ते म्हणाले, “यापूर्वी मी मुकुल रॉय आणि शुभेंदु अधिकारी सारख्या पक्षाशी विश्वासघात करणाऱ्यांना ओळखले होते. त्यांना उघड करण्याची जबाबदारी मी घेतली. येणाऱ्या काळात मी अशा लोकांना ओळखत राहीन.

    याशिवाय ममता बॅनर्जी यांनी पक्षातील बेशिस्तपणाविरुद्ध कडक इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, “अनेक नेते पक्ष शिस्त न पाळता प्रासंगिक राहण्यासाठी माध्यमांमध्ये विधाने करतात. पक्षाच्या नियमांचे उल्लंघन करू नका. ज्यांनी हे केले त्यांची ओळख आधीच झाली आहे.

    Abhishek Banerjee finally breaks silence on talks of a dispute with Mamata Banerjee

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी