बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman) यांना भारतीय वायुसेनेने (IAF) बढती दिली आहे. भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टनचा (Group Captain) दर्जा दिला आहे. आतापर्यंत ते विंग कमांडर पदावर होते.Balakot Strike hero Abhinandan Vardhaman promoted by IAS as Group Captain
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman) यांना भारतीय वायुसेनेने (IAF) बढती दिली आहे. भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टनचा (Group Captain) दर्जा दिला आहे. आतापर्यंत ते विंग कमांडर पदावर होते.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे F-16 विमान पाडले.
या युद्धात त्यांचे विमान पीओके (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये पडला होता. पाकिस्तानी सैन्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कैद केले होते. मात्र, अभिनंदन पाकिस्तानच्या कैदीतून भारतात परतले.
पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडल्याबद्दल अभिनंदन यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. लवकरच तो अधिकृतपणे ही रँक लिहिण्यास सुरुवात करणार असल्याचे, सांगण्यात येतय.
Balakot Strike hero Abhinandan Vardhaman promoted by IAS as Group Captain
महत्त्वाच्या बातम्या
- अखिलेश यादव यांना आयएसआयकडून संरक्षण आणि आर्थिक मदत, भाजपच्या मंत्र्यांचा संशय
- केंद्राने बंपर गिफ्ट, भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलव किंमती कमी केल्या, आता महाराष्ट्रातील आघाडी सरकार करणार का?
- शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
- मुलायमसिंह यादव यांच्या परिवारात आता होणार एकी; काका शिवपालांशी अखिलेश यादव करणार युती
- कॉँग्रेसमध्ये मद्यपान केलेले चालणार, नव्या संविधानात दिली जाणार सवलत