विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सने गांधी परिवाराच्या काँग्रेसशी युती जरूर केली, पण विधानसभा निवडणुकीत विजय मात्र एकहाती मिळविला. दोन पक्षांच्या युतीचा लाभ राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला होण्यापेक्षा प्रादेशिक पक्ष नॅशनल कॉन्फरन्सला जास्त झाला. Abdullah alliance with Gandhi in Jammu and Kashmir
परिणामी नॅशनल कॉन्फरन्सचे 42 आमदार निवडून आले, पण काँग्रेसला मात्र फक्त 6 आमदार निवडून आणता आले. त्यामुळे जम्मू काश्मीर मधल्या 90 जागांमध्ये 6 जागा मिळवून काँग्रेस आता चौथ्या नंबरचा पक्ष बनला आहे. काँग्रेसपेक्षा अपक्ष आमदारांचे बळ वाढून ते 7 जण निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती फक्त 3 आमदारांसह जम्मू कश्मीर विधानसभेत बसणार आहेत.
29 जागांसह भाजपचा जम्मू-काश्मीर मधला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला असून खऱ्या अर्थाने नॅशनल कॉन्फरन्स किंवा प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांना राज्यामध्ये आव्हान ठरू शकेल अशी ताकद भाजपने निर्माण केली आहे. काँग्रेसपेक्षा भाजपला जम्मू – काश्मीरमध्ये 5 पट अधिक यश मिळाले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सला मोठे यश मिळाल्यानंतर फारूक अब्दुल्लांनी उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील, असे परस्पर जाहीर करून टाकले. कारण त्यांना काँग्रेसशी त्यासाठी बोलायचीही गरजच उरली नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची निवडणूकपूर्व युती म्हणून फारूक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला हे स्वतःच्या मर्जीने काँग्रेसच्या कुठल्या नेत्याला कुठलेतरी मंत्री पद देऊ शकणार आहेत. अन्यथा काँग्रेसकडे आमदार संख्येच्या बळावर नॅशनल कॉन्फरन्सशी बार्गेरिंग करण्याची कुठलीही शक्तीच उरलेली नाही.
सलग दोन टर्म सत्तेवर असलेल्या भाजपला हरवून काँग्रेसला हरियाणात सत्ता मिळवता आली नाही. राहुल गांधींचा जातनिहाय जनगणनेच्या आधारे जाती वर्चस्वाचा अजेंडा हरियाणात चालू शकला नाही. पण जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या बरोबर केलेल्या युतीमध्ये काँग्रेस सत्तेवर येऊनही पक्षाला फारसा लाभ मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कारण 6 आमदार एवढ्या बळावर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याने जम्मू – काश्मीरमध्ये पक्षाची स्थिती तोळामासा झाली आहे.
Abdullah alliance with Gandhi in Jammu and Kashmir
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन!!
- Mumbai : मुंबईतील चेंबूर भागात घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
- Chandrakant Handore : मुंबईत पुन्हा हिट अँड रन, काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वार गंभीर जखमी, गणेश हंडोरेंना अटक
- shivsmarak जुवेरिया बोट, अंगात लाईफ जॅकेट, डोळ्याला दुर्बीण; संभाजीराजेंनी केली अरबी समुद्रात शिवस्मारकाची राजकीय “शोध मोहीम”!