• Download App
    भारत राहण्यालायक देश नाही म्हणणाऱ्या अब्दुल बारी सिद्दिकींचे घुमजाव; म्हणाले, भारत आमचाच, पाकिस्तान तुमच्या बापजाद्यांचा! Abdul Bari Siddiqui's ramblings saying that India is not a country worth living in

    भारत राहण्यालायक देश नाही म्हणणाऱ्या अब्दुल बारी सिद्दिकींचे घुमजाव; म्हणाले, भारत आमचाच, पाकिस्तान तुमच्या बापजाद्यांचा!

    वृत्तसंस्था

    पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्ती अब्दुल बारी सिद्दिकी यांची जीभ घसरली आहे. आधी भारत आता राहण्याच्या लायक देश उरला नाही असे म्हणणाऱ्या सिद्दिकी यांनी भारत आमचाच आहे. पाकिस्तान तुमच्या बापजाद्यांचा असेल, असे म्हटले आहे. RJD leader Abdul bari Siddiqui told his children India has become unsafe for them, but after backlash turned around his statement

    2014 नंतर भारतात अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटते, असे वक्तव्य बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची पत्नी किरण राव हिने केले होते. त्याचीच री राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादवांचे निकटवर्ती अब्दुल बारी सिद्दिकी यांनी 2022 च्या डिसेंबर मध्ये ओढली होती. आपली मुले हार्वर्ड आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत आहेत. त्यांना मी असा सल्ला दिलाय की भारतातला माहोल तुमच्या राहण्यालायक नाही. तुम्ही परदेशातच राहा. जमल्यास तिथले नागरिकत्व मिळवा. पण भारतात येऊ नका हे मी फार जड अंतःकरणाने माझ्या मुलांना सांगितले, असे वक्तव्य अब्दुल बारी सिद्धी यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते.

    सिद्दिकी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर चोहोबाजूंनी जबरदस्त भडिमार झाला. हा भडिमार झाल्यानंतर सिद्दिकी यांनी आपले बोल बदलले. एएनआय या वृत्तसंस्थेला बाईट देताना सिद्दिकी म्हणाले, अलिकडे एक फार मोठी फॅशन झाली आहे, तुम्ही पाकिस्तानात चालते व्हा असे म्हणायचे. पण पाकिस्तान आमचा नाही. पाकिस्तान तुमच्या बापजाद्यांचा असेल. भारतच आमचा आहे. आमचे पूर्वज भारतात राहिले. आम्हीही भारतातच राहणार, असे वक्तव्य सिद्दिकी यांनी केले आहे.

     

     

    सोशल मीडियातून टीकेची जोड उठल्यानंतर अब्दुल बारी सिद्धी यांना उपरती झाली आणि त्यांना भारत आपला वाटायला लागला. पण भारत आपला वाटण्याच्या वेळी देखील त्यांना पाकिस्तान इतरांच्या बाबजाद्यांचा असेल, असे वाटले आहे.

    RJD leader Abdul bari Siddiqui told his children India has become unsafe for them, but after backlash turned around his statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट