रिलायन्स आणि अदानी समुहात चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशातील दोन उद्योगपतींमध्ये चांगलीच स्पर्धा सुरू आहे.परवा आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून गौतम अदानींचे नाव समोर आले मात्र शेअर बाजारातील चढ उतारांमुळे पुन्हा एकदा मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. AASHIAS REACHEST PERSON MUKESH AMBANI AGAIN
अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी आणि रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांच्या उद्योग साम्राज्याची चर्चा जगभर होत असते.सध्या शेअर बाजार हा आशियातील सर्वात जास्त श्रीमंताच्या यादीत मोठा फेरबदल निर्माण करत आहे.
बुधवारी अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचा फायदा गौतम अदानींना झाल्यानं ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले होते. पण शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअर्सनी पुन्हा एकदा उसळी घेतल्यानं मुकेश अंबानी परत एकदा आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अवघ्या 600 मिलीयन डाॅलरनी मागं आहेत. परिणामी सध्या रिलायन्स आणि अदानी समुहात चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती सध्या 89.7 मिलीयन तर अदानी यांची संपत्ती 89.1 मिलीयन आहे. अदानी समुहाचं मार्केटमधील एकुण भाग भांडवल हे 10 ट्रिलीयन तर रिलायन्सचं भाग भांडवल 15.01 ट्रिलीयन डाॅलर इतकं आहे.
दरम्यान, सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्स एक मोठा करार करणार होती. पण करार रद्द झाल्यानं रिलायन्सला फटका बसला आहे. परिणामी सलग तीन दिवस रिलायन्सच्या भाग भांडवलात मोठी घसरण झाली आहे.
AASHIAS REACHEST PERSON MUKESH AMBANI AGAIN
महत्त्वाच्या बातम्या
- Pawankhind : स्वराज्याच्या लढ्यातील बाजीप्रभूंच्या महापराक्रमाची विजयगाथा ! ‘पावनखिंड’ चित्रपट ३१ डिसेंबरला होणार रिलीज
- आर्थिक दुर्बलांना दिलासा, यंदाच्या वर्षीपासूनच नीट प्रवेश प्रक्रियेतून मिळणार पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश
- बेटी बचावचा नारा प्रत्यक्षात, देशात पहिल्यांदाचा महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त
- होय, काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष…!!; पण हे पक्षाच्या नेत्यांना सांगावे का लागते…??