महाराष्ट्रा तील महाविकास आघाडीचे सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकारण करत असताना आसाममधील भाजपा सरकारने मात्र नवा आदर्श घालून दिला आहे. आसाम सरकारने आपल्या राज्यातील दारिद्रयरेषेखालील नागरिकांना मोफत रेमडेसिवीर देण्याची घोषणा केली आहे. Aasam goverment will provide Remdesiver free of cost to the people below the poverty line
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकारण करत असताना आसाममधील भाजपा सरकारने मात्र नवा आदर्श घालून दिला आहे. आसाम सरकारने आपल्या राज्यातील दारिद्रयरेषेखालील नागरिकांना मोफत रेमडेसिवीर देण्याची घोषणा केली आहे.
आसामच्या आरोग्य विभागाने सांगितले की, दारिद्रय रेषेखालील नागरिकांना रेमडेसिवीर मोफत देण्यात येईल तर इतर नागरिकांना सरकारने ठरवून दिलेल्या दरात रेमडेसिवीर खरेदी करावे लागणार आहे.
कोरोनाचा संसर्ग देशभरात वेगाने वाढत आहे. यामुळे गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषधाचाही तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीरची वाढती मागणी लक्षात घेत मोदी सरकारने रेमडेसिवीरच्या किमतीत 50 टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, तरीही गोरगरीबांना हे इंजेक्शन घेणे परवडत नाही. महाराष्ट्रातील अनेक गरीब नागरिकांचे प्राण त्यामुळे गेलेले आहेत.
केंद्रीय रसायने आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगतले, रेमडेसिवीरचे देशांतर्गत दुप्पट उत्पादन करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 12 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत आणखी 20 कारखान्यांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे मदत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
रेमडेसिवीरच्या दरात 50 टक्क्यांनी कपात करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत भारतातील सात कंपन्यांची नावे आणि सध्या असलेली रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत तसेच 50 टक्के किमतीत कपात केल्यावर किती रुपयांना रेमडेसिवीर उपलब्ध होईल याची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या वाचा
- भारताचे ज्युनिअर चार्ली चॅप्लिन विवेक यांचे तमिळनाडूत निधन
- क्युबामधील तब्बल सहा दशकांच्या कॅस्ट्रो युगाची अखेर, राऊल कॅस्ट्रो यांचा राजीनामा
- निवडणूक काळात तमिळनाडूत पकडली ४४६ कोटींची दारू; तर पाच राज्यांत हजार कोटींचा ऐवज जप्त!
- देशभरात आतापर्यंत तब्बल ७४७ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू , सर्वाधिक बळी तमिळनाडूत
- दिल्ली आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय लोकदल उभारणार स्मारक