• Download App
    Aarti of Mohammad Ali Jinnah by Mehbooba Mukti;

    मेहबूबा मुक्ती यांच्याकडून मोहम्मद अली जीनांची आरती; म्हणाल्या, ते तर गांधी-नेहरूंबरोबरचे स्वातंत्र्यसेनानी!!

    वृत्तसंस्था

    जम्मू : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी आज भारताची फाळणीस जबाबदार असणारे नेते आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची अक्षरशः आरती ओवाळली. मोहम्मद अली जीना हे तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबरीचे स्वातंत्र्यसैनिक होते. आपण त्यांना फाळणीसाठी जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. त्या आज जम्मूमध्ये पीडीपीच्या मेळाव्यात बोलत होत्या. Aarti of Mohammad Ali Jinnah by Mehbooba Mukti;

    केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढताना त्यांनी मोहम्मद अली जीना यांच्यावर जबरदस्त स्तुतीसुमने उधळली. मोहम्मद अली जीना यांना आत्ताचे सत्ताधारी लोक फाळणीसाठी जबाबदार ठरवतात. जीनांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट निर्माण केली आणि देशाची फाळणी केली, असा आरोप ते करतात. परंतु मोहम्मद अली जीना हे तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सर सय्यद अहमद खान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

    त्याच वेळी मोदी सरकारवर तिखट शब्दांत हल्ला चढवताना मेहबूबा मुक्ती म्हणाल्या, की एकीकडे हे स्वातंत्र्यसैनिक होते, तर दुसरीकडे ब्रिटिशांचे बुटचाटे आज आम्हाला देशभक्तीच्या बाता शिकवत आहेत. आज हजारो मोहम्मद अली जीना देशांमध्ये हिंदू – मुसलमानांमध्ये फूट पाडण्यात मग्न आहेत, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

    पाकिस्तानच्या सध्याचा राज्यकर्त्यांवर हल्ला चढवताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, की ते पाकिस्तान मध्ये खरा इस्लाम आणल्याचा दावा करतात. परंतु त्यांनी मुलांच्या हातांमध्ये पुस्तके आणि ज्ञानाची साधने देण्याऐवजी बंदुका हातात दिल्या आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

    Aarti of Mohammad Ali Jinnah by Mehbooba Mukti;

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे