विशेष प्रतिनिधी
डेहराडून : आम आदमी पक्षाने उत्तराखंडसाठीही मोफत विजेचे आश्वासन दिले आहे. आप सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट वीज मोफत मिळेल, अशी घोषणा पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. पुढील वर्षी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या या राज्यात भाजपची सत्ता आहे.
ते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी दिल्लीचे राज्यही तोट्यात होते, पण आता फायद्यात असल्याचा महालेखापालांचा अहवाल सांगतो. मोफत विजेसाठी फक्त बाराशे कोटी रुपये खर्च येतो. अंदाजपत्रक ५० हजार कोटी रुपयांचे आहे. AAP will give free power in Uttarakhand
याआधी गेल्या महिन्यात पंजाबसाठी केजरीवाल यांनी अशीच घोषणा केली होती. ते म्हणाले, अनेक ठिकाणी लोकांना भरमसाठ बिले आली आहेत. एका व्यक्तीला ६० हजार रुपयांचे बिल आले. त्यात दुरुस्ती करण्यासाठी तो जातो. तेव्हा दहा हजार रुपये भरल्यास उरलेले बिल माफ असे त्याला सांगितले जाते. त्यामुळे त्याची फरफट होते. चुकीच्या बिलांचे प्रमाण इतके प्रचंड आहे की संपूर्ण यंत्रणाही हा घोळ सावरू शकणार नाही.
AAP will give free power in Uttarakhand
महत्त्वाच्या बातम्या
- जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी चने-फुटाणेच, तीन ते ८५ लाखांपर्यंत भरपाईची मागणी आणि हाता टिकवताहेत २३ हजार रुपये
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?