विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पुढील निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ४०३ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली. अर्थात आपच्या एंट्रीचा फायदा शेवटी भाजपलाचा होण्याची शक्यता असल्याचा राजकीय तज्ञांचा कयास आहे.AAP will contest elections in UP
कारण आपमुळे विरोधी मतांची आणखी फाटाफूट होण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा आपसुखपणे भाजपलाच होणार आहे.‘आप’ने २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेच्या तर, प्रदेशातील काही जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना यश मिळाले नव्हते.
केजरीवाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती. तेथेही केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली होती.
संजय सिंह म्हणाले ‘‘आमचा पक्ष उत्तर प्रदेशात काँग्रेस पेक्षा जास्त ताकदवान आहे.
पंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने ४० जागा मिळविल्या होत्या तर ‘आप’ने ८३ जागा मिळविल्या. या निवडणुकीत ‘आप’ला एकूण ४० लाख मते मिळाली, तर पक्षाचे १६०० उमेदवार रिंगणात होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४०३ पैकी केवळ सात जागांवर विजय मिळविता आला होता.
AAP will contest elections in UP
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे नवे खोटे : परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले – भारताने काश्मीरमध्ये वापरली रासायनिक शस्त्रे
- प्रॉव्हिडंट फंडच्या खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ
- हिंदू-मुस्लीम संबंध; दोन ध्रुव एकत्र आणणारा सार्वजनिक गणेशोत्सव
- भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते गुजरातचे मुख्यमंत्री; घाटलोडियाचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी
- सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा छळ, काँग्रेसच्या आमदारासह मुलगा आणि मुलीवर गुन्हा