विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल भाजपने संकल्प पत्र जाहीर केल्याबरोबर आज अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 15 गॅरंटीचे कार्ड जारी केले. यामध्ये महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना केजरीवाल यांनी रिपीट केली. पण 15 गॅरेंटी आणि लाडकी बहीण योजना रिपीट यामुळे केजरीवाल तिसऱ्यांदा सत्तेवर येतील की दिल्लीचे जनता त्यांना विश्रांती देईल??, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. AAP
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सत्तेवर आली तर महिलांना 2100 रुपये देण्याची गॅरंटी केजरीवाल यांनी दिली. महाराष्ट्रात हीच योजना सुपरहिट ठरली त्यामुळे महायुतीचे सरकार तिसऱ्यांदा रिपीट झाले. पण आता लाडकी बहीण योजना आर्थिक दृष्ट्या परवडेल का याविषयी महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली त्यावर अनेक क्रिया प्रतिक्रिया व्यक्त झाल्या पण म्हणून लाडकी बहीण योजना पूर्णपणे थांबवली पाहिजे, असे कोणी सांगण्याची हिंमत केलेली नाही.
त्याउलट अरविंद केजरीवाल यांनी महिलांना 2100 रुपये ही लाडकी बहीण योजना दिल्ली रिपीट केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दिल्लीत कुठूनही कुठे फ्री बस राईड, युवकांसाठी रोजगार गॅरंटी, महिला सन्मान गॅरंटी, संजीवनी योजना गॅरंटीतून वृद्धांना मोफत उपचार, पाण्याची चुकीची बिले माफ, प्रत्येक घरी 24 तास पाणी, यमुना नदी साफ, रस्ते चकाचक, आदी 15 गॅरंटींची भरमार केजरीवाल यांनी दिल्लीच्या मतदारांवर केली. पण दिल्लीतले मतदार केजरीवाल यांना तिसऱ्या टर्मची सत्ता देतील का??, हा सवाल कायम आहे. त्याचे दिल्लीचे मतदार फेब्रुवारी महिन्यात देतील.