मालीवाल यांच्या आधीच्या पतीची मागणी AAP Rajya Sabha MP Swati Maliwal assault case
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी प्राणघातक हल्लाच झाला. त्यासाठी अरविंद केजरीवाल यांनाच जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी मागणी स्वाती मालीवाल यांचे आधीचे पती नवीन जयहिंद यांनी केली.
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना जयहिंद म्हणाले : स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला अरविंद केजरीवाल यांच्या घरात झाला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करायला हवा. कारण हा प्रकार त्यांच्या घरी घडला होता. खासदार संजय सिंग हा अरविंद केजरीवाल यांचा “पोपट” आहे. संजय सिंग यांना माहिती होते की अशी घटना घडणार आहे. पण त्यांनी नंतर सारवासारव केली.
लोक केजरीवालांच्या घराला “सीएम हाऊस” म्हणतात, पण ते खरं तर “गटर हाऊस” आहे. राज्यसभा खासदारावर हल्ला होणे ही एक धोकादायक घटना आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर एफआयआर दाखल व्हायला हवा. कारण हे त्यांच्या घरी घडले आहे. स्वातीच्या जीवाला धोका आहे. कारण तिला धमकी देण्यात आली आहे, अन्यथा, कोणीही पोलिस स्टेशनमधून परत येणार नाही. ही माझी वैयक्तिक बाब नाही, दिल्ली पोलिसांनी मौन बाळगणे योग्य नाही आणि NCW ने तिच्या जीवाला धोका आहे, याची दखल घेऊन कारवाई करावी.
स्वाती बाहेर आली पाहिजे. तिला घाबरून गप्प बसवू शकत नाही, तिच्यावर काय दबाव आणला गेला आहे??, हे मला माहिती नाही. पण दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. स्वातीने माझी मदत घेतली तर मी नक्कीच मदत करेन. बाकीचे लोकही मदतीला यायला तयार आहेत. स्वातीला मी अन्य कोणापेक्षाही अधिक चांगले ओळखतो.
स्वाती मालीवाल यांच्या आधीच्या पतीने हे निवेदन केल्याने मारहाण प्रकरणातले गांभीर्य अधिक वाढले आहे ते दारू घोटाळ्याबरोबर जोडले गेले आहे.