• Download App
    अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यास आपचा कडाडून विरोध, पक्षाचा थेट विधानसभेत ठराव| AAP objects Asthans appointment in Delhi

    अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यास आपचा कडाडून विरोध, पक्षाचा थेट विधानसभेत ठराव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – गुजरात केडरच्या राकेश अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यावर सत्तारुढ आपने आक्षेप घेतला आहे. अस्थाना यांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घेण्यात यावा असा ठरावच दिल्ली विधानसभेत मंजूच करण्यात आला. AAP objects Asthans appointment in Delhi

    अस्थाना यांची मंगळवारीच नियुक्ती झाली. त्यादिवशी त्यांच्या निवृत्तीला केवळ तीन दिवस बाकी होते. दिल्ली पोलिस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्त्यातीत येतात. जनहिताच्यादृष्टिने विशेष बाब म्हणून त्यांना प्रारंभी एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले.



    अस्थाना हे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखपदी नियुक्ती होण्यास अपात्र असल्याचे वृत्त याआधीच आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या वृत्ताचा दाखला दिला. याच कारणास्तव ते दिल्ली पोलिस प्रमुख या पदासही पात्र नाहीत, असा दावा त्यांनी केला.

    ते म्हणाले, अस्थाना येत्या ३१ तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. अस्थाना यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे आणि त्यानुसार नियुक्त्या करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.

    AAP objects Asthans appointment in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Land-for-Job Case: लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबासह 40 जणांवर आरोप निश्चित; लालू-राबडी, तेजस्वी-मीसा, हेमा-तेजप्रताप यांच्यावर खटला चालणार

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही