विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – गुजरात केडरच्या राकेश अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यावर सत्तारुढ आपने आक्षेप घेतला आहे. अस्थाना यांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घेण्यात यावा असा ठरावच दिल्ली विधानसभेत मंजूच करण्यात आला. AAP objects Asthans appointment in Delhi
अस्थाना यांची मंगळवारीच नियुक्ती झाली. त्यादिवशी त्यांच्या निवृत्तीला केवळ तीन दिवस बाकी होते. दिल्ली पोलिस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्त्यातीत येतात. जनहिताच्यादृष्टिने विशेष बाब म्हणून त्यांना प्रारंभी एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले.
अस्थाना हे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखपदी नियुक्ती होण्यास अपात्र असल्याचे वृत्त याआधीच आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या वृत्ताचा दाखला दिला. याच कारणास्तव ते दिल्ली पोलिस प्रमुख या पदासही पात्र नाहीत, असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, अस्थाना येत्या ३१ तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. अस्थाना यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे आणि त्यानुसार नियुक्त्या करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.
AAP objects Asthans appointment in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा
- आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
- स्वत : ला भद्रलोक समजणाऱ्या महुआ मोईत्रांचा हिंदीद्वेष, भाजपाच्या खासदाराला म्हणाल्या बिहारी गुंडा
- आसाम आणि मिझोराम सीमावादाला तब्बल शंभर वर्षांची संघर्षांची वादळी किनार