विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दारू घोटाळ्याच्या ED ईडीच्या तपासात आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राघव चढ्ढा यांची नावे घेतली, अरविंद केजरीवालांनी. पण आता आपल्या संभाव्य अटकेचे आतिशी मात्र खापर फोडत आहेत भाजपवर!!, असेच त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले. AAP leaders target to bjp
दिल्लीच्या मंत्री अतिशी मार्लेना यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा कांगावा करून आपल्याला, सौरभ भारद्वाज आणि राघव चढ्ढा यांना ED अटक करणार असल्याचे सांगितले. भाजपच्या केंद्र सरकारला टप्प्याटप्प्याने आम आदमी पार्टीच्या दिल्लीच्या सगळ्या मंत्र्यांना तुरुंगात घालायचे आहे. त्यातला पहिला टप्पा त्यांनी मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात घालून पूर्ण केला आहे. त्या पुढच्या टप्प्यात ते आपल्याला, सौरव भारद्वाज आणि राघव चढ्ढा यांना अटक करून पूर्ण करणार आहेत, असा दावा आतिशी यांनी केला.
वास्तविक दारू घोटाळ्यातला आरोपी आपल्याला नव्हे, तर आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज तसेच राघव चढ्ढा यांना रिपोर्टिंग करत होता. त्यामुळे त्याचे सगळे व्यवहार किंवा गैरव्यवहार हे त्यांच्याशी संबंधित होते, असे अरविंद केजरीवाल यांनी ED च्या तपासात सांगितले. ED चे वकील ऍडिशनल सॉलिसिटर जनरल गुप्ता यांनी त्याचा राऊज अवेन्यू कोर्टात स्पष्ट उल्लेख केला. पहिल्यांदाच या प्रकरणात आतिशी, सौरव भारद्वाज आणि राघव चढ्ढा यांची नावे भर कोर्टात घेतली गेली. त्यामुळे त्यांना अटक होणे अपरिहार्य आहे. पण या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती वेगळी असताना आतिशी यांनी मात्र आपल्या संभाव्य अटकेचे खापर आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर फोडले.
दारू घोटाळ्यातला पैसा हा गोवा विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आला होता. आतिशी या आम आदमी पार्टीच्या गोव्याच्या इन्चार्ज होत्या. त्यामुळे सर्व पैशाचा व्यवहार त्यांनी केला, असे आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार एस. एन. सिंह यांनी सांगितले होते. त्यामुळे आतिशी यांची अटक अपरिहार्यच आहे, पण त्यांनी मात्र त्याचे खापर भाजपवर फोडले आहे.
AAP leaders target to bjp
महत्वाच्या बातम्या
- परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या कारस्थानाला दिले सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले…
- भ्रष्टाचार विरोधातल्या “मसीहा”ची तिहार जेल मधली कोठडी; वाचा बरॅक नंबर 2 ची कहाणी!!
- टॅक्स नोटीस प्रकरणी काँग्रेसला तूर्तास दिलासा, इन्कम टॅक्स विभागाने सुप्रीम कोर्टात म्हटले- लोकसभा निवडणुकीपर्यंत कारवाई करणार नाही
- मध्य प्रदेशातील भोजशाळेत ASI सर्वेक्षण सुरूच राहणार!