• Download App
    आमीर खानने डायलिसिस सेंटर उभारून देण्याचे आश्वासन दिले; पण नंतर फोन उचलणेही बंद केले, अभिनेते अनुपम श्याम यांच्या बंधुचा आरोप|Aamir Khan promised to set up a dialysis center; But then he also stopped picking up the phone, accusing actor Anupam Shyam's brother

    आमीर खानने डायलिसिस सेंटर उभारून देण्याचे आश्वासन दिले; पण नंतर फोन उचलणेही बंद केले, अभिनेते अनुपम श्याम यांच्या बंधुचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलीवुडमधील बड्या अभिनेत्यांचा आणखी एक वाईट अनुभव अभिनेते अनुपम श्याम यांचे बंधू अनुराग श्याम यांनी आमीर खानच्या रुपाने मांडला आहे. आमीर खानने प्रतापगढ येथे डायलिसिस सेंटर उभारून देण्याचे आश्वासन दिवंगत अभिनेते अनुपम श्याम यांना दिले होते. मात्र, नंतर आमीरने त्यांचे फोनही उचलणे बंद केले असा आरोप अनुपम यांचे बंधू अनुराग श्याम यांनी केला आहे.Aamir Khan promised to set up a dialysis center; But then he also stopped picking up the phone, accusing actor Anupam Shyam’s brother

    एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनुराग यांनी म्हटले आहे की अनुपम श्याम यांना दर तीन दिवसांनी डायलिसिस करण्याची गरज होती. प्रतापगढ या त्यांच्या मुळ गावी सेंटर नसल्यामुळे ते आपल्या आईला भेटायलाही जाऊ शकत नव्हते. एकदा आमीर खान याला भेटले असताना त्याने डायलिसिस सेंटर उभे करून देण्याचे आश्वासन दिले.



     

    मात्र, हे केवळ आश्वासनच राहिले. वारंवार फोन करूनही आमीरने उचलणेच बंद केले. त्यामुळे अनुपम श्याम अस्वस्थ होता. कारण डायलिसिस सेंटर नसल्याने प्रतापगढ येथे आजारी असलेल्या आपल्या आईला भेटायला ते जाऊ शकत नव्हते.

    अनुराग श्याम म्हणाले, गेल्या आठवड्यात शूटिंग दरम्यान अनुपम खूप पाणी प्यायले. त्यामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम झाला. आठवड्यातून तीनदा त्यांचे डायलिसिस व्हायचे आणि या काळात त्यांना जास्त पाणी प्यायचे नव्हते. त्यांच्या फुफ्फुसात खूप पाणी जमा झाले होते त्यामुळे त्यांना श्वास घेता येत नव्हता. त्यांची प्रकृती इतकी गंभीर झाली की त्यांना ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले.

    अनुपम यांना खूप वेदना होत होत्या. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी ते मला म्हणाले होते – भैया, मला श्वास घेता येत नाहीये. त्यांना शूटिंगची खूप आवड होती. जेव्हा त्यांना टीव्ही शो ‘प्रतिज्ञा’मध्ये काम मिळाले होते, तेव्हा जणू त्यांना नवीन आयुष्य मिळाले होते. ते खूप आनंदी होते. मला आठवतं, जेव्हा त्यांनी त्यांच्या शोचा पहिला भाग पाहिला होता, ज्यामध्ये त्यांची एंट्री झाली होती. त्यावेळी ते आपला आनंद शब्दांत सांगू शकत नव्हते, असे अनुराग यांनी सांगितले.

    Aamir Khan promised to set up a dialysis center; But then he also stopped picking up the phone, accusing actor Anupam Shyam’s brother

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य