• Download App
    पंजाबमधील 'आप'च्या मंत्री अनमोल गगन मान यांच्या विधानामुळे I.N.D.I.A. मोठा धक्का; म्हणाल्या 'आमचा करार हा...'Aam Aadmi Party leader Gagan Manns statement led to the I.N.D.I.A. Big shock

    पंजाबमधील ‘आप’च्या मंत्री अनमोल गगन मान यांच्या विधानामुळे I.N.D.I.A. मोठा धक्का; म्हणाल्या ‘आमचा करार हा…’

    विशेष प्रतिनिधी

    मोहाली : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात देशातील राजकीय पक्ष एकवटण्याच्या प्रयत्नांना धक्के बसत आहेत. जसे या अगोदरही काही उदाहरणांमधून  दिसून आले आहेत.  खरे तर आम आदमी पक्षाने यापूर्वीच काही ठिकाणी स्वबळाची  भाषा वापरलेली आहे. त्यात आता आज आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने दावा केला की पंजाबमध्ये आम्ही कोणाशीही हातमिळवणी न करता पक्ष स्वबळावर लोकसभेच्या सर्व १३ जागा लढवेल आणि जिंकेल.  आम्ही इंडियन आहोत. I.N.D.I.A. चा भाग आहोत  पण ‘तुमच्याशी जो काही करार झाला होता तो पंजाबबाहेरचा होता’. असे त्यांनी म्हटले आहे. Aam Aadmi Party leader Gagan Manns statement led to the I.N.D.I.A. Big shock

    भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी (I.N.D.I.A.) मध्ये घटक म्हणून समाविष्ट असलेले काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष यांच्यातील परस्पर समन्वयाबाबत दोनदा बैठका झाल्या आहेत. या बैठकीनंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा आणि पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग हे सुरुवातीपासूनच आम आदमी पक्षासोबतच्या युतीच्या विरोधात होते, परंतु सूत्रांनी दावा केला की ते हायकमांडशी सहमत नव्हते. काँग्रेस 6 आणि ‘आप’ लोकसभेच्या 7 जागांवर निवडणूक लढवू शकेल, असे मानले जात होते. विभाजनाच्या तयारीसाठी, काँग्रेस पक्षानेही जागा चिन्हांकित करण्यास सुरुवात केली होती, परंतु दरम्यान बुधवारी पंजाबच्या पर्यटन मंत्री अनमोल गगन मान यांनी असे काही सांगितले ज्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला धक्का बसला  आहे.

    आज पत्रकार परिषदेत अनमोल गगन मान म्हणाल्या की, ‘आम्ही काँग्रेससोबत कोणतीही युती करणार नाही. पंजाबचे लोक भगवंत मान यांना मानतात. जनतेने प्रामाणिक पक्षाला निवडून दिले असून, काँग्रेससोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. यासह, त्यांनी पक्ष नेतृत्वाची भूमिका स्पष्ट केली की 2024 मध्ये पक्ष पंजाबमधील सर्व 13 जागा एकट्याने लढवण्याच्या विचारामध्ये आहे.

    Aam Aadmi Party leader Gagan Manns statement led to the I.N.D.I.A. Big shock

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य