• Download App
    ममतांच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीनेही तोडली INDI आघाडी; काँग्रेस नेत्यांची झाली पळापळी!!|Aam Aadmi Party also broke the INDI alliance after Mamata; Congress leaders ran away!!

    ममतांच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीनेही तोडली INDI आघाडी; काँग्रेस नेत्यांची झाली पळापळी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधींचे भारत जोडो न्याय यात्रा आसाम मधून बाहेर पडून पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी “एकला चलो रे” ची घोषणा करत राज्यात काँग्रेस बरोबरची अस्तित्वातच नसलेली INDI आघाडी तोडून टाकली. त्यांच्या पाठोपाठ पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी पंजाब मध्येही INDI आघाडी तोडून टाकली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची चांगलीच पळापळी झाली.Aam Aadmi Party also broke the INDI alliance after Mamata; Congress leaders ran away!!



    ममता बॅनर्जी INDI आघाडीत आधीच अस्वस्थ होत्या. बंगालमध्ये त्यांना काँग्रेस सह डाव्या पक्षांना अजिबात सत्तेमध्येच काय, पण विरोधात बसण्याचा राजकीय वाटाही द्यायचा नव्हता. त्यामुळे बंगाल मधल्या लोकसभेच्या 42 जागा तृणामूळ काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार अशी घोषणाच त्यांनी करून टाकली. त्यावेळी काँग्रेसने आपल्याला विश्वासात घेतली नाही. त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेविषयी आपल्याला काहीही माहिती दिली नाही, असा आरोप केला.

    ममता बॅनर्जींनी हा आरोप करताच काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि के. सी. वेणूगोपाल पुढे सरसावले आणि त्यांची आम्ही समजूत काढू असे सांगते झाले, पण काँग्रेस नेत्यांची ही “समजूतीची” भाषा सुरू असताना तिकडे पंजाब मध्ये भगवंत मान यांनी पंजाब मधल्या लोकसभेच्या 13 जागा आम आदमी पार्टी स्वतंत्र लढवणार असल्याची घोषणा करून टाकली. भाजपचा पराभव करायला आम्ही सक्षम आहोत. आम्हाला कोणत्याही पक्षाची गरज नाही, असे त्यांनी सांगून टाकले. त्यामुळे बंगाल पाठोपाठ पंजाब मध्ये INDI आघाडीला नुसता धक्काच बसला असे नाही, तर ती आघाडी पूर्ण तुटून पडली.

    त्यामुळे काँग्रेस नेत्यांची आज चांगली दमछाक झाली. ममता बॅनर्जी आणि भगवंत मान या दोन्ही नेत्यांना भाजपचा पराभव करायचा आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमची INDI आघाडी 26 पक्षांची आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या कुरबुरी होतच राहतात. परंतु, आमचे अंतिम ध्येय भाजपचा पराभव करण्याचे असल्याने आम्ही एकमेकांशी चर्चा करून आमच्या सगळ्या समस्या मिटवून टाकून भाजप समोर INDI आघाडी म्हणूनच एकजुटीने उभे राहू, असा दावा के. सी. वेणूगोपाल यांनी केला. पण बंगाल आणि पंजाब या दोन राज्यात इंडिया आघाडी INDI तुटल्याची वस्तुस्थिती मात्र त्यांना लपवता आली नाही.

    Aam Aadmi Party also broke the INDI alliance after Mamata; Congress leaders ran away!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र