• Download App
    Aam Aadmi Party आम आदमी पक्षानेही बिहार विधानसभा

    आम आदमी पक्षानेही बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली भूमिका

    Aam Aadmi Party

    जाणून घ्या, खासदार आणि प्रवक्ते संजय सिंह यांनी काय म्हटलं आहे?


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – आम आदमी पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय सिंह यांनी म्हटले आहे की त्यांचा पक्ष यावर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करेल. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे त्यांचे मुख्य मुद्दे आहेत. एवढंच नाहीतर त्यांनी ‘आप’च्या इतर कोणत्याही पक्षाशी युतीची शक्यता फेटाळून लावली.

    पक्षाने आयोजित केलेल्या निषेधात सहभागी होण्यासाठी संजय सिंह मंगळवारी पाटणा येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, फक्त लोकसभा निवडणुकीसाठीच ‘इंडिया’ आघाडीशी समन्वय होता. ‘आप’ दिल्ली आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत एकटी लढली आहे. बिहारच्या निवडणुकीतही असेच होईल. रोजगार शोधणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबद्दल त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारवर टीका केली.



    संजय सिंह म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत ‘आप’ आवाहन करेल की, जो पक्ष लोकांना दिल्लीतून हाकलून लावत आहे, त्याला तुम्ही बिहारमधून हाकलून लावा. आज दिल्लीत झोपडपट्ट्या पाडल्या जात आहेत. येथे राहणारे लोक बिहार-उत्तर प्रदेशचे आहेत. ते गेल्या ५० वर्षांपासून तिथे राहत आहेत. पण दिल्लीचे भाजप सरकार त्यांना हाकलून लावत आहे.

    याशिवाय संजय सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विनंती केली की जर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली तर त्यांनी दिल्लीत बुलडोझरमुळे होणारा विनाश थांबवण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी सांगितले की त्यांचा पक्ष बिहारमध्ये संदेश यात्रा काढत आहे. एकूण सात यात्रा होणार आहेत. त्यापैकी तीन आधीच पूर्ण झाल्या आहेत. यात्रेदरम्यान निवडणुकीच्या शक्यताही तपासल्या जात आहेत.

    Aam Aadmi Party also announced its stance for Bihar Assembly elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bilawal Bhutto : बिलावल म्हणाले- सईदला भारतात प्रत्यार्पण करण्यास तयार; अतिरेकी हाफिज सईदचा मुलगा संतापला

    Vice President : उपराष्ट्रपती म्हणाले- न्यायमूर्ती वर्मा प्रकरणात तत्काळ FIR आवश्यक; एवढी रोख रक्कम कुठून आली हे जाणून घेणे महत्त्वाचे

    Tahawwur Rana : 26/11 हल्ल्याच्या वेळी दहशतवादी तहव्वूर राणा मुंबईत होता; NIA चौकशीदरम्यान दिली कबुली