• Download App
    आम आदमी पक्ष गुजरात विधानसभेच्या स्वतंत्रपणे सर्व १८२ जागा लढविणार; अरविंद केजरीवालांची घोषणा|Aam Aadmi Party (AAP) to contest on all seats in the 2022 Gujarat Legislative Assembly Polls: AAP leader and Delhi CM Arvind Kejriwal

    आम आदमी पक्ष गुजरात विधानसभेच्या स्वतंत्रपणे सर्व १८२ जागा लढविणार; अरविंद केजरीवालांची घोषणा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सन २०२२ मध्ये होणाऱ्या पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणूकांची राजधानीत जोरात चर्चा सुरू झाली असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणूकीचा विषय चर्चेत आणला आहे.Aam Aadmi Party (AAP) to contest on all seats in the 2022 Gujarat Legislative Assembly Polls: AAP leader and Delhi CM Arvind Kejriwal

    सन २०२२ मध्ये होणाऱ्या गुजरात विधासभेच्या सर्व म्हणजे १८२ जागांवर आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असे केजरीवाल यांनी दिल्लीत जाहीर केले आहे.



    गुजरातमध्ये २०२० मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकाही आम आदमी पक्षाने स्वतंत्रपणे लढल्या होत्या. त्यापैकी महत्त्वाच्या सुरत महापालिकेत त्या पक्षाने काँग्रेसला मागे टाकून २६ जागा जिंकून महापालिकेतले विरोधी पक्षनेतेपद पटकावले आहे.

    गुजरातच्या महापालिका निवडणूकांनी आम आदमी पक्षाला आत्मविश्वास दिल्याने पक्षाने विधानसभेच्या सर्व म्हणजे १८२ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

    नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि काँग्रेस यांच्यात गेल्या ४ निवडणूकांमध्ये लढती झाल्या आहेत. राज्यात व्दिपक्षीय पध्दत असल्यासारख्या निवडणूका लढविल्या जातात. चारही निवडणूकांमध्ये भाजपने काँग्रेसवर मात केली आहे.

    पण यावेळी आम आदमी पक्षाने विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर करून भाजपच्या सत्तेला आव्हान दिले आहे, त्याच बरोबर काँग्रेसच्या विरोधी पक्ष म्हणून असलेल्या राजकीय स्थानालाही आव्हान निर्माण केले आहे.

    गुजरातमध्ये सत्तेच्या राजकारणातला तिसरा महत्त्वाचा खेळाडू बनून पुढे येण्याची अरविंद केजरीवालांची ही चाल आहे.

    Aam Aadmi Party (AAP) to contest on all seats in the 2022 Gujarat Legislative Assembly Polls: AAP leader and Delhi CM Arvind Kejriwal

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!