Wednesday, 7 May 2025
  • Download App
    लव्ह जिहाद : म्हणे "त्याला" मारू नका पोलिसी दंडे; पण आफताबला वाचविण्याचे अनेक फंडे!! Aaftab - Shraddha love Jihad : liberals trying to save Aaftab Poonawala from capital punishment by using verity means

    लव्ह जिहाद : म्हणे “त्याला” मारू नका पोलिसी दंडे; पण आफताबला वाचविण्याचे अनेक फंडे!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लव्ह जिहाद करून श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करणारे आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्याची आदेश देताना कोर्टाने त्याच्यावर थर्ड डिग्री वापरू नये, असे आदेश दिले… हे कायदेशीर आदेश असले आणि आफताबची केस पोलीस पुढे नेत असले तरी आफताब – श्रद्धा लव्ह जिहाद प्रकरणातला लिबरल धार्मिक अँगल बघता आफताबला वाचविण्याचे वेगवेगळे फंडे वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये त्याच्या वैद्यकीय तपासणी पासून ते राजकीय आणि सामाजिक अँगल पर्यंत सर्व मुद्द्यांचा समावेश आहे. Aaftab – Shraddha love Jihad : liberals trying to save Aaftab Poonawala from capital punishment by using verity means

    आफताबने केलेला गुन्हा हा साधा खून आहे. त्याला लव जिहाद वगैरे शब्द जोडू नका, अशा आशयाची ट्विट आधीच अनेक लिबरल पत्रकारांनी केली आहेतच. त्या निमित्ताने “भक्त” शब्द वापरून लिबरल पत्रकारांनी कुठलाही विषय मोदी सरकारला नेऊन भिडवण्याचा नेहमीचा फंडाही वापरला आहे.

    पण त्या पलिकडे जाऊन आफताब प्रकरणातला एक वेगळा लिबरल ट्विस्ट आहे तो म्हणजे आफताब हा कसा मनोरुग्ण आहे, अशा मनोरुग्णांमध्ये कोणती संप्रेरके नसल्याने ते क्रूर बनतात, मग त्यांचा वर्तन व्यवहार कसा सर्वसामान्यांपेक्षा वेगळा होतो, वगैरे उदाहरणे पेश करून स्वयंघोषित लिबरल फॉरेन्सिक वैद्यकीय तज्ञांनी आफताबला कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्याचा देखील फंडा आजमावला आहे. आफताब याला एकदा मनोरुग्ण ठरवले आणि ते वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध केले की तो फाशी सारख्या शिक्षेतून वाचू शकतो हा या मागचा खरा फंडा आहे.

    त्याचबरोबर आफताब आणि श्रद्धा लव्ह जिहादचा मुद्दा पूर्णपणे लिबरल जमातीच्या अंगावर येतो आहे, हे लक्षात येताच बाकीचे राजकीय मुद्दे पुढे आणून आफताब – श्रद्धा लव्ह जिहादचा मुद्दा मागे सारण्याचाही फंडा या निमित्ताने वापरला गेला आहे.



    आता तर आफताब आणि श्रद्धा हे ड्रग्स विकत होते त्यांच्याकडे रात्री अपरात्री काही गिऱ्हाईकही येत होती अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्याने काही माध्यमांनी दिल्या आहेत. यातला तथ्यंश किती याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. मात्र या बातमीतून श्रद्धा ही देखील कशी गुन्हेगार होती, ती ड्रग्सच्या व्यापारात कशी सामील होती, असे दाखवून लव्ह जिहादचा अँगल सॉफ्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो.

    या संदर्भात वरिष्ठ पत्रकार मकरंद मुळे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे ती अशी :

    आफताबला वाचवण्यासाठी स्वातंत्र्यवीरांचा वापर

    आफताब विषयाला कव्हरिंग फायर देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा राज्यातील यात्रा समर्थक पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते, मानवीहक्कवाले, भाषावादी, पुरोगामी, सेक्युलर, लिबरल यांनी राहुल गांधी यांना घेण्यास लावला आहे. भारत जोडोची वैचारिक भूमिका एकही मूळचा काँग्रेसी ठरवत नाही. भारत जोडोतून होणारी मांडणी आधुनिक डावे आणि समाजवादी यांच्या बुद्धीचे प्रताप आहेत.

    त्वरित बदलला गोलपोस्ट

    यात्रेच्या दरम्यान आफताब अडचणीचे ठरणार हे त्या कॅम्पच्या लक्षात आहे. ते हिंसक कृत्य स्पेस व्यापणार हे लक्षात येताच विचारवंत टोळक्याने त्वरित “गोल पोस्ट” बदलला आहे. लव्ह जिहादवर चर्चा होऊ नये यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर टार्गेट केले आहे. दिल्लीतील त्यावेळेचे एनएसयुआय वाल्याचे तंदूर कांड ते तुकडे-तुकडेवाला अफताब हे अडचणीचे ठरू लागले की, दाबून टाकणे ही काँग्रेसने वर्षानुवर्षे पोसलेल्या इको-सिस्टीमची कार्यपद्धती आहे.

    वैचारिक संघर्ष दीर्घकाळचा

    राज्यात राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्यांनी जिहादचे आधुनिक आव्हान दुर्लक्षित करू नये. आफताबरुपी संकट आणि स्वातंत्र्यवीरांचा अपमान एक दिवसाचा किंवा काही वेळाचा निषेध कार्यक्रम नसून तो दीर्घकाळ चालणारा संघर्ष आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठी नियमितपणे जागरण, प्रबोधन आणि त्यातून राष्ट्रीय सहमती घडवणे आवश्यक आहे. अस्वस्थ समाज मानसाला योग्य दिशा देऊन कार्यप्रवण करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहेत. अन्यथा, एक दिवसाचा इव्हेंट होईल.

    हिंदूंच्या मर्यादांची जाण

    आगामी काळात घर घर से आफताब निकलतील आणि स्वातंत्र्यवीर पुन्हा अपमानित होतील. स्वातंत्र्यवीरांचा सातत्याने अवमान करणाऱ्याला वृत्तीला जरब न बसवू न शकल्याने आफताब पुरस्कृत जिहादी हिंसाचार फोफावत आहे. भावूक, भाबड्या हिंदूंच्या मर्यादा स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणारे म्हणजेच आफताबचे समर्थन करणारे ओळखून आहेत. हिंदू त्यांच्या क्लुप्त्या ओळखणार का ? हा कळीचा मुद्दा आहे.

    द्वेष पेरणी आणि लांगुलचालन

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान १९६० पासून ठरवून, १९९० नंतर वेगाने आणि २०१४ नंतर तीव्रतेने केला जात आहे. १९२६ साली स्वामी श्रद्धानंद यांचा मारेकरी अब्दुल रशीद आणि २०२२ साली आफताब याला वाचवण्याचे धोरण समान आहे. विनायक दामोदर सावरकर यांची जात काढून द्वेष पेरणी तर, अब्दुल-आफताब यांचा पंथ लक्षात घेऊन लांगुलचालन हे सूत्र आहे.

    – मकरंद मुळे

    Aaftab – Shraddha love Jihad : liberals trying to save Aaftab Poonawala from capital punishment by using verity means

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात, अजून बरेच काही बाकी!!

    Operation sindoor : जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचा मिसाईल हल्ले!!

    Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!