• Download App
    आधार लिंक सक्तीची नाही, पण आधार लिंकमुळे मतदार यादी व्यवस्थापन सुकर; दुबार - तिबार मतदारनोंदणी कळेल व टळेल!! Aadhaar link is not mandatory, but Aadhaar link makes voter list management easier

    आधार लिंक सक्तीची नाही, पण आधार लिंकमुळे मतदार यादी व्यवस्थापन सुकर; दुबार – तिबार मतदारनोंदणी कळेल व टळेल!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मतदार नोंदणीत आधार लिंक सक्तीची नाही. पण मतदान कार्ड आणि मतदार यादीला आधार कार्ड लिंक केल्यामुळे मतदार यादीचे देशातील व्यवस्थापन सुकर होईल आणि दुबार – तिबार मतदार नोंदणी ताबडतोब कळून येईल. मतदाराला विचारून एकच ठिकाणी मतदार नोंदणी कायम राहून इतर ठिकाणची नोंदणी रद्द होईल, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. Aadhaar link is not mandatory, but Aadhaar link makes voter list management easier

    निवडणूक सुधारणा विधेयकात या तरतुदी आहेत. मात्र यात तरतुदींवरून मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी अक्षेप घेतला आहे. यावरून राजकारण देखील सुरु झाले आहे.
    बोगस मतदार नोंदणी कोणाला हवी आहे, त्या करतो हे सगळ्या जगाला माहिती आहे, आता त्याला प्रतिबंध होणार असल्यामुळेच विरोधक अनावश्यक वाद तयार करत आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. तसेच मतदार नोंदणीत आधार लिंक सक्तीची केलेली नाही. तरी देखील विरोधकांनी त्याविषयी अपप्रचार चालवल्याचे भाजपचे म्हणणे आहे, तर आपल्याकडे डेटा सुरक्षा कायदाच अस्तित्वात नाही. त्यामुळे मतदार डेटाचाही गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे आधार लिंकला आमचा विरोध आहे, असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. सरकारला निवडणूक सुधारणा आणण्याची घाई झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.



    मात्र आधार लिंक आणि मतदार यादी यासंदर्भात सरकारने सविस्तर खुलासा केला आहे. मतदार कार्ड आणि मतदार यादीत आधार लिंक सक्तीची नाही. परंतु आधार लिंक केल्याचे फायदे मोठे आहेत. त्यामुळे मतदार यादी सुधारण्यास खूप मोठी मदत होणार आहे. एवढेच नाही तर दुबार – तिबार नोंदणी समजून येईल. वारंवार घर बदलल्यामुळे जुनी नोंदणी रद्द करण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. कारण फक्त पट्टा बदलावा लागेल आणि जुनी नोंदणी आपोआप रद्द होईल. या सुविधा मतदारांना मिळतील असा खुलासा सरकार मार्फत करण्यात आला आहे.

    Aadhaar link is not mandatory, but Aadhaar link makes voter list management easier

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार