• Download App
    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची भेट : 28 सप्टेंबरला चंदीगड विमानतळाचे शहीद भगतसिंह विमानतळ नामकरण!!|A visit to the Amrit Mahotsav of Independence: Chandigarh Airport to be renamed as Shaheed Bhagat Singh Airport on September 28!!

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची भेट : 28 सप्टेंबरला चंदीगड विमानतळाचे शहीद भगतसिंह विमानतळ नामकरण!!

    वृत्तसंस्था

    चंदीगड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात केंद्र सरकारने देशाला एक अनोखी भेट दिली आहे. येत्या 28 सप्टेंबर रोजी प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांची जयंती आहे. याच दिवशी पंजाबची राजधानी चंदीगडच्या विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंग करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात केली आहे.A visit to the Amrit Mahotsav of Independence: Chandigarh Airport to be renamed as Shaheed Bhagat Singh Airport on September 28!!

    चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. ती मागणी केंद्र सरकारने पूर्ण केल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात केली आहे.



    – क्रांतिकारकांचा सन्मान

    केंद्रातील भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने क्रांतिकारकांचा नेहमीच सन्मान केला आहे. कोलकत्ता विमानतळाचे नामकरण नेताजी सुभाष चंद्र बोस, तर अंदमान निकोबारच्या विमानतळाचे नामकरण वीर सावरकर विमानतळ असे दोन्ही याच सरकारच्या काळात घडले आहे. सुभाष बाबू आणि सावरकरांची नावे विमानतळांना देण्याचा निर्णय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात घेतला होता. तो त्याच वेळी अमलात आणण्यात आला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारने चंदीगड विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंग विमानतळ असे केले आहे.

    A visit to the Amrit Mahotsav of Independence: Chandigarh Airport to be renamed as Shaheed Bhagat Singh Airport on September 28!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही