वृत्तसंस्था
राजकोट : कोणतीही निवडणूक म्हटली की राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप, नेत्यांची भाषणे, प्रचाराचा धुरळा, कार्यकर्त्यांच्या मेजवान्या यातून निवडणुकांचे असंख्य किस्से घडतात. ते रंजक असतात. काही गावे, शहरे निवडणुकांसाठी तर प्रसिद्ध आहेत, तिथल्या निवडणुका नेहमीच गाजतात. पक्षांचे बालेकिल्ले उध्वस्त झाले, बालेकिल्ले राखले अशा भाषांनी त्या गावांच्या आणि मतदारसंघांच्या बातम्या सजतात. A village in Gujarat where political parties are banned from campaigning
गुजरात मधले असेच एक गाव आहे, जे प्रत्येक निवडणुकीत गाजत असते. त्याचे कारणही तसेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या गावांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचाराला पूर्णपणे बंदी आहे. निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला ग्रामस्थ गावात येऊच देत नाहीत, तर प्रचाराची बात दूरच. पण या गावाचे खरे वैशिष्ट्य त्या पुढचे आहे, ते म्हणजे गावात 100% मतदान खात्रीने होतेच होते. कारण गावात मतदान न करणाऱ्याला 51 रुपयांचा दंड भरावा लागतो. त्यामुळे हे गाव 100% लोकशाही मानणारे आहे. पण लोकशाहीच्या नावाने जे वेगवेगळे “शंख” केले जातात, त्याला मात्र गावाचा विरोध दिसतो आहे. या गावाचे नाव आहे, समाधियाल. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात हे गाव वसले आहे.
समाधियाल या गावाने स्वतःची, पण राज्यघटनेच्या चौकटीत राहून नियमावली तयार केली आहे. गावात अस्वच्छता माजवल्यास दंड, तलाव आणि नदीत प्रदूषण केल्यास अथवा सांडपाणी सोडल्यास दंड, रस्त्यात थुंकल्यास दंड, असे दंडाचे विविध प्रकार तिथे आकारले जातात. त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्याला देखील मोठी दंडात्मक शिक्षा केली जाते. यातूनच 1983 पासून समाधियाल गावात राजकीय पक्षांच्या प्रचाराला बंदी घालण्यात आली. पण त्याचवेळी गावाने हे सुनिश्चित केले, की इथले मतदान मात्र 100 % होईल आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सन 2022 पर्यंत गावाने 100% मतदानाची प्रथा देखील लोकशाही वरच्या निस्सीम श्रद्धेने पाळली आहे. समाधियाल हे गाव खऱ्या अर्थाने भारतातल्या घटनादत्त लोकशाहीचे पाईक बनले आहे.
A village in Gujarat where political parties are banned from campaigning
महत्वाच्या बातम्या