• Download App
    माणुसकीचे अनोखे उदाहरण, प्लाझ्मा दानासाठी त्याने मोडला पहिलाच रोजाचा उपवास|A unique example of humanity, he broke the first Roja for plasma donation

    माणुसकीचे अनोखे उदाहरण, प्लाझ्मा दानासाठी त्याने मोडला पहिलाच रोजाचा उपवास

    माणूसकी हाच खरा धर्म असे म्हटले जाते. उदयपूरमधील अकिल मन्सूरी यांनी हेच दाखवून देत दोन महिलांना प्लाझ्मा दान करºयासाठी आपला पहिलाच रमझानचा रोजा मोडला.A unique example of humanity, he broke the first Roja for plasma donation


    विशेष प्रतिनिधी 

    जयपूर : माणूसकी हाच खरा धर्म असे म्हटले जाते. उदयपूरमधील अकिल मन्सूरी यांनी हेच दाखवून देत दोन महिलांना प्लाझ्मा दान करºयासाठी आपला पहिलाच रमझानचा रोजा मोडला.
    अकिल मन्सुरी यांना कोरोना झाला होता.

    त्यातून ते बरेही झाले होते. त्यामुळे प्लाझ्मा दानासाठी आरोग्यदृष्टया फिट होते. मात्र, मुस्लिम धर्मियांचा रमझानचा महिना सुरू झाल्याने रोजा धरला जात आहे. प्लाझ्मा दानासाठी खाणे आवश्यक असल्याने या काळाता ते शक्य नव्हते.



    अकिल यांना सोशल मीडियावरून समजले की दोन महिलांना प्लाझ्माची तातडीने गरज आहे. त्यातील एक ३६ वर्षांची तर दुसरी ३० वर्षांची होती. त्यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. त्यामुळे त्याच रक्तगटाचा प्लाझ्मा मिळणे गरजेचे होते.

    अकिल यांना समजल्यावर ते तातडीने रुग्णालयात पोहोचले. त्यांनी प्लाझ्मादान करण्याची तयारी दर्शविली. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा प्लाझ्मा या महिलांसाठी योग्य असल्याचाही निर्वाळा दिला. त्यासाठी अकिल यांची अ‍ॅँटीबॉडी टेस्टही केली.

    प्लाझ्मा म्हणजे रक्तदान करण्याअगोदर काहीतरी खावे लागते. त्याप्रमाणे डॉक्टरांनी त्यांना काहीतरी खाऊन घेण्यास सांगितले. परंतु, अकिल यांनी रोजा धरला होता. त्यांनी डॉक्टरांनी तसे सांगितलेही. परंतु, डॉक्टर म्हणाले की जोपर्यंत अकिल काहीतरी खात नाहीत

    तोपर्यंत त्यांचे रक्त घेतले जाऊ शकत नाही. अकिल यांच्यापुढे धर्मसंकट उभे राहिले. त्यांनी माणुसकी धर्माचे पालन केले आणि रोजा मोडून खाण्याचे ठरविले. त्यांनी खाल्यानंतर त्यांचा प्लाझ्मा डॉक्टरांनी घेतला आणि दोन महिलांचे प्राण वाचले.

    अकिल म्हणाले, पवित्र रमझान महिन्यातील रोजे मला मोडावा लागले. मात्र, मी माणुसकीचा धर्म निभावला आहे. एक माणूस म्हणून ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे रोझा मोडला याबाबत मला कोणताही पश्चाताप होत नाही.

    कारण माझ्यामुळे दोन महिलांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या प्रकृती सुधारावी हिच अल्लाकडे प्रार्थना आहे.अकिल गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनातून बरा झाला. त्यानंतर त्याने १७ वेळा प्लाझ्मादान केले आहे.

    A unique example of humanity, he broke the first Roja for plasma donation

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली