• Download App
    हिजाब बंदीवर सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठात मतभेद; प्रकरण सरन्यायाधीशांकडे A two-judge bench of the Supreme Court disagreed on the hijab ban

    हिजाब बंदीवर सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठात मतभेद; प्रकरण सरन्यायाधीशांकडे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हिजाब बंदीच्या मुद्द्यावरुन सुनावणी करणा-या सर्वोच्च न्यायालयातील दोन सदस्यीय खंडपीठात निकालाबाबत मतभेद झाले असून न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय अवैध ठरवला, तर न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी हिजाब बंदीचा कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे आता हिजाब वादाचे प्रकरण सर न्यायाधीशांकडे गेले असून तीन सदस्यीय न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी घेतली जाऊ शकते. A two-judge bench of the Supreme Court disagreed on the hijab ban

    कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीचा निर्णय लागू केला होता. या निर्णयावर कर्नाटक उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मागच्या काही दिवसांमध्ये न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला.

    प्रकरण सरन्यायाधीशांकडे

    दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात मतभेद असल्याने आता हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर जाण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नवीन खंडपीठाची नियुक्त करतील. त्यामुळे आता हिजाब बंदीचा निर्णय आणखी लांबण्याची शक्यता आहे.

    कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

    कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाने 15 मार्च रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी लागू करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका फेटाळून लावल्या होत्या.

    महिलांसाठी हिजाब घालणे हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही, असा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश परिधान करण्याचा राज्य सरकारचा आदेश योग्य आहे. तसेच धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भाग म्हणून हिजाब स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला होता.

    A two-judge bench of the Supreme Court disagreed on the hijab ban

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले