• Download App
    पुण्यातील नवले पुलावर कंटेनरला धडकल्याने ट्रकने घेतला पेट, चार जणांचा होरपळून मृत्यू A truck caught fire after a container collided with it on Navale bridge in Pune four people were killed

    पुण्यातील नवले पुलावर कंटेनरला धडकल्याने ट्रकने घेतला पेट, चार जणांचा होरपळून मृत्यू

    मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश, नवले पूल चौकात अपघातचे सत्र सुरूच

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  शहरातील नवले पुलावर अपघातचे सत्र सुरूच आहे. या ठिकाणी आठवडभारतून किमान दोन तीन भीषण अपघात घडतच आहेत. काल रात्री या ठिकाणी पुन्हा एक भीषण जीवघेणा अपघात घडला. कंटेनरची धडक झाल्याने ट्रकने पेट घेतला, या भीषण आगीत ट्रकच्या केबीनमधून प्रवास करणाऱ्या चार  जणांचा होरपळून  मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. आग विझवण्यात  अग्निशमन दलाला यश आलं आहे. A truck caught fire after a container collided with it on Navale bridge in Pune four people were killed

    हा भीषण अपघात स्वामी नाराण मंदिराजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. मुंबईच्या दिशेने निघालेला हा ट्रक स्वामी नारायण मंदिराजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटनेरवर धडकला. यामुळे कंटेनर रस्त्यावर उलटला. तर ट्रक मध्ये मक्याचा भूसा असल्याने ट्रकने तत्काळ पेट घेतला. क्षणार्धात आगीने भीषण रूप धारण केले आणि ट्रकच्या केबिनमधील चार जणांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. अन्य दोन जण  गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

    अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली गेली.  पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. या भीषण अपघातमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागविली होती.

    A truck caught fire after a container collided with it on Navale bridge in Pune four people were killed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार