जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानच्या दौसा येथून मोठी बातमी समोर आली आहे. दौसा जिल्हाधिकारी कार्यालय सर्कलजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ पेक्षा अधिक लोक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सर्कलजवळील रेल्वे कल्व्हर्टवर बसचे नियंत्रण सुटून बस खाली रेल्वे रुळावर पडल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, पुलावरून खाली पडल्यानंतर बसचा चक्काचूर झाला आणि ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जिथे अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राजस्थानात भाजप पिक्चरमध्येच नाही, खरी लढत ही ईडी आणि काँग्रेसमध्ये’; अशोक गेहलोत यांचा दावा
- सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साइड बिझनेस : प्रवीण दरेकर
- कर्नाटकात विरोधकांची उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री बनवण्याची ऑफर; जेडीएस नेते म्हणाले- आमचे 19 आमदार पाठिंबा देतील, शिवकुमार म्हणाले- मला घाई नाही
- मध्य प्रदेशात काँग्रेसचे नेते स्वतःच्याच मुलांना सेट करण्याच्या नादात, निवडणुकीच्या मैदानात; मोदींचा टोला