• Download App
    सर्व्हे जो माध्यमांनी सांगितला नाही; तब्बल 53 % लोक म्हणतात, देशात लव्ह जिहाद सुरू!!A survey that the media did not report; As many as 53% people say, Love Jihad started in the country!!

    सर्व्हे जो माध्यमांनी सांगितला नाही; तब्बल 53 % लोक म्हणतात, देशात लव्ह जिहाद सुरू!!

    प्रतिनिधी

    मुंबई : सर्व्हे जो माध्यमांनी सांगितला नाही किंवा माध्यमांनी तो निष्कर्ष बातमीच्या मध्यभागी किंवा तळात सांगितला. अथवा दुर्लक्षित ठेवला, तो निष्कर्ष लव्ह जिहाद संदर्भातला आहे. A survey that the media did not report; As many as 53% people say, Love Jihad started in the country!!

    देशात वाढत्या लव्ह जिहादच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशात सर्व्हे करण्यात आला. त्यासाठी देशभरातील १ लाख ४० हजार नागरिकांची मते जाणून घेण्यात आली, त्यातल्या 53 % लोकांनी मुसलमान पुरुष हे लव्ह जिहादमध्ये सामील असतात, असे मत मांडले आहे.

    लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदू मुलींचे आयुष्य बनते शापित 

    इंडिया टुडे – सी व्होटर यांनी ‘मूड ऑफ द नेशन’ अंतर्गत एक सर्व्हे केला. त्याच्या राजकीय निष्कर्षाच्या बातम्या माध्यमांनी दिल्या त्यातही मराठी माध्यमांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या 34 जागा मिळतील असा निष्कर्ष आवर्जून सांगितला पण याच सर्व्हेत लव्ह जिहादबाबत लोकांची मते जाणून घेण्यात आली. ती मात्र मराठी माध्यमांनी पूर्ण दुर्लक्षित केली.

    या सर्व्हेत देशभरातील १,४०,९१७ (एक लाख ४० हजार ९१७) लोकांना प्रश्न विचारण्यात आले. एवढेच नाही तर सी व्होटरने 1,05,008 (1 लाख 5 हजार 8) नागरिकांच्या मुलाखतींचे विश्लेषणही केले आहे. सर्व्हेनंतर जाहीर झालेल्या अहवालात म्हटले आहे की, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 53% लोकांचे म्हणणे आहे की, मुस्लिम तरुण हे लव्ह जिहादमध्ये सामील आहेत. लव्ह जिहादसाठी मुस्लिम तरूण हिंदू मुलींना लक्ष्य करतात. त्यासाठी मुस्लिम तरुण आपले नाव आणि धर्म लपवून मुलींशी मैत्री करतात. ते हिंदू मुलींना त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. यानंतर हिंदू मुलींना धर्मांतर करण्यास भाग पाडतात. एवढेच नाही तर त्यांना बलात्कार, मारहाण सारख्या घटनांनाही सामोरे जावे लागते. मात्र, यानंतरही त्याचे आयुष्य शापित बनते. कारण, बहुतेक प्रकरणांमध्ये एकतर मुस्लिम सोडून देतात किंवा हिंदू मुलींना मारतात.

    मात्र, कम्युनिस्ट, तथाकथित उदारमतवादी आणि तथाकथित बुद्धीवादी आणि इस्लामी धर्मगुरु नेहमीच लव्ह जिहादचे सत्य नाकारतात. त्याला एक काल्पनिक गोष्ट म्हणतात.

    मात्र, इंडिया टुडे – सी व्होटरच्या सर्व्हेच्या अहवालात लव्ह जिहाद ही काल्पनिक कथा नसून इस्लामवाद्यांचे वास्तव असल्याचे सत्य बाहेर आले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटकसह अनेक राज्यांनी लव्ह जिहादच्या गंभीर धोक्याचा सामना करण्यासाठी कठोर कायदे केले आहेत. महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायद्याची प्रतीक्षा आहे.

    A survey that the media did not report; As many as 53% people say, Love Jihad started in the country!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य