• Download App
    आज सायंकाळी 18 मिनिटांचा थरार; वाचा चांद्रयान 3 लँडिंगचा क्षणाक्षणाचा प्रवास!!A snapshot of the Chandrayaan 3 landing

    आज सायंकाळी 18 मिनिटांचा थरार; वाचा चांद्रयान 3 लँडिंगचा क्षणाक्षणाचा प्रवास!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आज 23 ऑगस्ट 2023 सायंकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनिटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे A snapshot of the Chandrayaan 3 landing

    5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत आज जे होणार आहे ते समजून घेऊ.

    1. रफ ब्रेकिंग फेज

    25×134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन 800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून 7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .

    2. Atitude Holding फेज

    “Atitude” not “Altitude” .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल. यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.


    चांद्रयान-3च्या लँडिंग दरम्यान पंतप्रधान मोदी व्हर्चुअली ‘इस्रो’शी जुडणार!


    3. Fine ब्रेकिंग फेज

    175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल.

    4. टर्मिनल डीसेंट फेज

    हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील आणि देशात जल्लोष असेल.

    5. मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे.

    ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे.

    चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.

    ISRO Website : https://isro.gov.in

    YouTube : https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss

    Facebook : https://facebook.com/ISRO

    DD National TV
    from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.

    A snapshot of the Chandrayaan 3 landing

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!