विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसमोर आपला टिकाव लागणार नाही याची आधीपासूनच जाणीव असलेल्या शरद पवारांनी महाविकास आघाडीत कनिष्ठ भावाची भूमिका घेत 10 जागांवर समाधान मानले, पण त्यामुळे पवारांच्या पक्षाचा आत्मविश्वास ढळण्याचेच दिसून आले. A shocking revelation that the Lok Sabha election is not a target
पण आता तसा आत्मविश्वास ढळला नसल्याचे दाखवताना पवारांनी माध्यमांसमोर एक डाव टाकत लोकसभा निवडणूक हे आपले टार्गेटच नाही, आपले टार्गेट विधानसभा निवडणूक आहे, असे सांगून ठाकरे आणि काँग्रेसला चिमटा काढला आहे. पण पवारांच्या लोकसभा निवडणूक टार्गेट नसल्याच्या वक्तव्याने ऐन निवडणुकीच्या मध्यावर त्यांच्याच पक्षातील हवा निवडणुकीच्या गेली आहे.
शरद पवार यांनी अहमदनगर दौऱ्यात लोकसभा निवडणूक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे टार्गेट नसल्याचा खुलासा केला. 2019 मध्ये आमचे 4 खासदार होते. मात्र आता आमचे “लक्ष्य” लोकसभा नाही, तर विधानसभा आहे. त्यामुळे लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा खेचून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्या, अशी मखलाशी पवारांनी केली. तरीही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात 50 % जागा निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. पण पवारांच्या लोकसभा टार्गेट नसल्याच्या खुलाशाने त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसची हवा निघाली!!
A shocking revelation that the Lok Sabha election is not a target
महत्वाच्या बातम्या
- विदर्भात 2019 पेक्षा 5% कमी मतदान; देशातील मतदानात 8% घट, गतवेळी झाले होते सरासरी 69% मतदान
- देशातल्या पहिल्या नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शाहांबरोबर 5 – 6 बैठका होऊनही पवारांनीच शब्द फिरवला; अजितदादांचाही
- इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा ‘हा’ मोठा निर्णय
- मणिपूरमध्ये मतदानाच्या दिवशी हिंसाचार, मतदान केंद्रावर EVM फोडले