• Download App
    मंत्र्यांसोबत सेल्फी घ्यायचा असेल तर शंभर रुपये मोजा, मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांची अनोखी ऑफर| a selfie with a minister, count 100 rupees, a unique offer from Madhya Pradesh Cultural Minister Usha Thakur

    सेल्फी घ्यायचा असेल तर शंभर रुपये पक्षनिधीत द्या; मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांची अनोखी ऑफर

    विशेष प्रतिनिधी

    खांडवा : सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री आल्यावर त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडते. त्यात मंत्र्याचा खूप वेळही जातो. त्यामुळे मध्य प्रदेशातील सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. a selfie with a minister, count 100 rupees, a unique offer from Madhya Pradesh Cultural Minister Usha Thakur

    आपल्यासोबत सेल्फी घ्यायचा असेल तर शंभर रुपये जमा करावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात ही सर्व रक्कम पक्षनिधीमध्ये जाणार आहे.खांडवा येथे बोलताना उषा ठाकूर म्हणाल्या, सेल्फी देताना खूप वेळ जातो. त्यामुळे आम्हाला पुढील कार्यक्रमाला जाण्यास उशिर होतो.



    त्यामुळे संघटनेच्या दृष्टीने विचार करत असे ठरविले आहे की मंडळ कार्यकारिणीमध्ये जो कोणी सेल्फी घेईल त्याला पक्षाच्या खजिनदाराकडे शंभर रुपयांची रक्कम जमा करावी लागेल. हा निधी पक्षाच्या कामासाठी वापरले जाईल.

    उषा ठाकूर म्हणाल्या माझे भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की एखाद्याचा सन्मान करताना पुष्पगुच्छ देण्यापेक्षा पुस्तक द्या. हे पुस्तक कोणाला तरी उपयोगी पडेल.उषा ठाकूर या आपल्या अनेक उपक्रमांमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी महिला अत्याचाराच्या आरोपींसाठी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती.

    a selfie with a minister, count 100 rupees, a unique offer from Madhya Pradesh Cultural Minister Usha Thakur

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये